Take a fresh look at your lifestyle.

म्हणून दुसरी-आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी लर्निंग लॉस ब्रीज कोर्स; पहा नेमका याचा काय होणार आहे फायदा

नाशिक : ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा, अनेकांकडे ऑनलाइन शिक्षणाची नसलेली सोय यामुळे अपेक्षित आकलन न झाल्याने विद्यार्थ्यांना कसे तयार करायचे ही मोठी समस्या शिक्षण विभागापुढे आहे. हा लर्निंग लॉस भरून काढण्यासाठी लर्निंग लॉस ब्रीज कोर्स नावाचा विशेष कार्यक्रम राबवला जाणार आहे. कोरोना कालावधीत शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले असून त्यावर ही मात्रा आता वापरण्यात येणार आहे.

Advertisement

लॉकडाऊन आणि शाळा बंद असलेया कालावधीत विद्यार्थ्यांना जे नवीन शिकवले जात होत ते त्यांच्यापर्यत पोहोचले नाही. अशा स्थितीत नवीन वर्गात दाखल होत असल्याने ब्रिज कोर्सच्या माध्यमातून त्यांचा झालेला लर्निंग लॉस भरून काढण्याचा प्रयत्न होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शिक्षण मंडळाकडून हा ब्रिज कोर्स इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवला जाणार आहे. खासगी, सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित या सर्व शाळांसाठी हा कोर्स बंधनकारक असणार आहे. ४५ दिवस चालणाऱ्या या ब्रीज कोर्समध्ये भाषा, गणित, सामाजिक शास्रे अशा सर्व विषयावर स्वतंत्र ब्रिज कोर्स असणार आहे.

Advertisement

Advertisement

ग्रामीण, दुर्गम आणि अति दुर्गम भागातील विद्यार्थी, तर शिक्षण प्रवाहापासून दूर गेल्यासारखे चित्र निर्माण झाले. अशा परिस्थितीत विद्यार्थी पुढील इयत्तेत दाखल होत, नवीन शैक्षणिक वर्षाच्या शाळा सुरू होत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर ही पोकळी भरून काढल्याशिवाय पुढील इयत्तेचा अभ्यासक्रम सुरू करू नये, अशी अनेक शिक्षकांची मागणी असल्याने हा महत्वाचा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी घेतला आहे.

Advertisement
लर्निंग लॉस ब्रीज कोर्स मुद्दे
विद्यार्थी इयत्ता तिसरीत असल्यास ब्रिज कोर्स हा दुसरीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार
पुढील वर्गात प्रवेश करत असताना विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या संकल्पना स्पष्ट झाल्याची तपासणी यात होणार
मागील वर्षाच्या संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत का? हे तपासण्यासाठी किंवा त्या अधिक प्रभावीपणे शिकवण्यासाठी हा ब्रिज कोर्स मदत करणार
नवीन इयत्तेत शिकत असताना मागील वर्षातील ज्या ज्या संकल्पनांवर नवीन इयत्तेतील अभ्यासक्रम अवलंबून आहे त्या संकल्पना ब्रीज कोर्स मध्ये दृढ करण्याचा प्रयत्न
गणित आणि विज्ञान हा विषयांवर जास्त लक्ष केंद्रीत केले जाणार
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक आणि मानसिक दृष्टीकोन समोर ठेवून या ब्रीज कोर्सची निर्मिती

 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply