Take a fresh look at your lifestyle.

वाव.. रेल्वे आणतेय करोना फ्री कोच; पहा प्लाज्मा एअर थेरपीची नेमकी काय असणार कमाल..!

नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून दिलासा मिळाल्याच्या बातम्या आता येत आहेत. मात्र, तरीही हे संकट संपलेले नाही. उलट तिसऱ्या लाटेची भिती जगासमोर आहे. अशावेळीही एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. कारण, रेल्वे विशिष्ट प्रकारचे कोरोना सेंसेटीव कोच तयार करत आहे. या डब्यात एन्ट्री घेतली की लगेच कोरोना विषाणू खतम होणार आहे. या कोचमध्ये प्लाज्मा एअर थेरपीचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Advertisement

रेल्वेच्या एलएचबी कोचला कोरोना सेंसिटीव्ह बनवण्यात येणार आहे. या कोचमध्ये प्लाजमा एअर थेरपीचा वापर करण्यात येणार आहे. ज्यामुळे कोरोना संक्रमण पसरवणारे व्हायरस काही सेकंदातच नष्ट होणार असल्याचा दावा केला जात आहे. या कोचच्या गेटच्या हँडलवर कॉपर कोटिंग असणार आहे. कोचमध्ये टाइटेनियम डाइ ऑक्सइड असणार आहे. यावर कोरोना विषाणू जिवंत राहू शकत नाही. हे विशिष्ट प्रकारचे कोच एसी आणि नॉन एसी या दोन प्रकारात तयार केले जाणार आहे, अशी माहिती आहे.

Advertisement

या योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली आहे. कोच तयार करण्याचे काम कारखान्यात सुरू आहे. कोच तयार झाले की रेल्वेस जोडण्यात येणार आहेत. अशा पद्धतीने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वेद्वारे प्रयत्न करण्यात येत आहेत. कारण, आता दुसऱ्या लाटेचा जोर खूप कमी झाला आहे. रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. त्यामुळे राज्ये लॉकडाउनचे निर्बंधात सवलती देत आहेत. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, कोरोनाचा धोका कायम आहे, लॉकडाऊनचे निर्बंध कमी केल्याने कोरोना पुन्हा फैलावण्याचा धोका आहे. त्यामुळे आताच खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू नये यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

Advertisement

दरम्यान, जगभरात या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न  केला जात आहे. यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. लसीकरणाच्या माध्यमातून या आजाराचा धोका कमी होत आहे. त्यामुळे अनेक देशांनी लसीकरणावर भर दिला आहे. तर दुसरीकडे या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply