Take a fresh look at your lifestyle.

तिसरी लाट रोखण्यासह रुग्णसेवेसाठी केंद्र सरकार होत आहे सज्ज; पहा नेमके काय केलेय नियोजन

दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात जसा हाहाकार उडाला तसा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी केंद्र सरकारने तयारी करण्यास सुरुवात केली आहे. मागील अनुभवातून शहाणपण मिळाल्याने त्याचा उपयोग आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी केला जात आहे. देशात तिसऱ्या लाटेचा धोका पाहता केंद्र सरकार पुढील तीन महिन्यात देशभरात ५० मॉड्यूलर दवाखाने सुरू करणार आहे. या दवाखान्यांत आयसीयू बेड आणि ऑक्सिजनची व्यवस्था राहणार आहे.

Advertisement

देशभरात हे दवाखाने फक्त तीन आठवड्यात तयार करण्याचे नियोजन आहे. एका दवाखान्यासाठी साधारण तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, आपत्कालीन परिस्थितीत या दवाखान्यांना एका सप्ताहाच्या काळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट सुद्धा करता येणार आहे. एका दवाखान्यात साधारण १०० बेड्स असतील. या व्यतिरिक्त आयसीयूसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. हे दवाखाने अशा दवाखान्यांच्या आसपासच्या परिसरात तयार केले जाणार आहेत जेथे वीज, पाणी आणि ऑक्सिजनची व्यवस्था असेल. देशातील लहान शहरे आणि ग्रामीण भागातील आरोग्याच्या दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने मॉड्यूलर हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने कार्यवाही सुरू केली आहे. सध्या राज्यांबरोबर चर्चा सुरू आहे. त्यानंतर दवाखाने कोणत्या राज्यात सुरू करायचे, याबाबत निर्णय घेण्यात येईल.

Advertisement

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हाहाकार उडाला होता. लाखोंच्या संख्येत रुग्ण सापडत असल्याने देशातील आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडली होती. रुग्णांना योग्य उपचार सुद्धा मिळत नव्हते. दवाखान्यात ऑक्सिजन सुद्धा मिळत नव्हता. या ऑक्सिजन अभावीच अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. या व्यतिरिक्त अन्य वैद्यकिय उपकरणांची टंचाई होती, अशी विदारक परिस्थिती होती. आता मात्र, कोणत्याही परिस्थिततीत पुन्हा असे घडू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. सध्या देशात दुसरी लाट आटोक्यात येत आहे. रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. नवीन रुग्णांचेही प्रमाण खूप कमी झाले आहे. तसेच कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply