Take a fresh look at your lifestyle.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारत-न्यूझीलंडचे संघ सज्ज; पहा कोण आहे संघात

मुंबई : शुक्रवारपासून आयसीसीची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी भारत-न्यूझीलंडचे संघ सज्ज आहेत. दोन्ही तुल्यबळ संघ असल्याने यामधून कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

भारताने अापल्या १५ सदस्यीय संघामध्ये पाच वेगवान गोलंदाज अाणि दाेन फिरकीपटूंची निवड केली असून न्यूझीलंड टीम २० खेळाडूंसह इंग्लंड दाैऱ्यावर दाखल झाली हाेती. यातून टीमने १५ जणांची फायनलसाठी निवड केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियनशिप जिंकण्याची मोहीम फत्ते करण्यासाठी सराव करून सज्ज आहे. तर, दुखापतीतून सावरलेल्या विलियम्सन अाणि यष्टिरक्षक फलंदाज वाॅल्टिंगला संघात स्थान निश्चित करता अाले. २५ वर्षीय वाॅल्टिंग हा करिअरमधील शेवटची कसोटी खेळणार अाहे.

Advertisement

Advertisement

कसाेटीच्या पाचही दिवस या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात अाला अाहे. यात पावसाच्या व्यत्ययाची पहिल्या दिवशी ८० टक्के, दुसऱ्या, तिसऱ्या व चाैथ्या दिवशी ७० टक्के शक्यता अाहे. पावसामुळे ही कसाेटी अनिर्णीत राहिल्यास दोन्ही संघांना संयुक्तपणे चॅम्पियनशिप जाहीर करण्यात येईल.

Advertisement
भारतीय संघ :

Advertisement

विराट कोहली (कप्तान), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुभमान गिल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, हनुमा विहारी, जडेजा, अश्विन, बुमराह, शमी, ईशांत, सिराज, उमेश यादव

न्यूझीलंड संघ :

Advertisement

विलियम्सन (कर्णधार), टॉम, ट्रेंट बोल्ट, डेवॉन कॉनवे, कॉलिन डी ग्रँडहोम, मॅच हेनरी, कायल जेमिसन, टॉम लॅथम, हेनरी निकोल्स, एजाज पटेल, टीम साउथी, रॉस टेलर, निल वॅगनर, बीजे वॅटलिंग, विल यंग

 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply