Take a fresh look at your lifestyle.

GST परताव्यात भेदभाव; पहा मोदी सरकारकडून नेमके काय केले जातेय, काँग्रेसचा गंभीर आरोप

दिल्ली : जीएसटीच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने केंद्र सरकरवर गंभीर आरोप केला आहे. जीएसटीची थकबाकी देण्यात केंद्र सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केला आहे. देशातील काँग्रेसशासित राज्यांना केंद्र सरकारने अजूनही थकबाकीचे पैसे दिलेले नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे.

Advertisement

त्यांनी पुढे म्हटले, की ‘जूनपर्यंत एकट्या पंजाबचेच 7393 कोटी रुपये केंद्र सरकारकडे थकले आहेत. तरीसुद्धा वित्तमंत्री म्हणतात की सर्व राज्यांना जीएसटीचे थकबाकी दिली आहे, मग आता खरे कोण बोलत आहे ?, याचे उत्तर कोण देणार ?,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘छत्तीसगडचे 3069 कोटी रुपये आणि राजस्थानचे 7142 कोटी रुपये केंद्र सरकारने दिलेले नाहीत, तरी देखील वित्त मंत्रालयाने दावा केला आहे, की सर्व राज्यांना जीएसटीचे थकीत पैसे दिले आहेत.’

Advertisement

काँग्रेसशासित राज्यांना भेदभावाची वागणूक केंद्र सरकार देत असल्याचे आरोप याआधीही झाले आहेत. आता पुन्हा काँग्रेसने पुन्हा हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपासून कोरोना संकटात सुद्धा जीएसटीचे संकलन वाढले आहे. दर महिन्यात १ लाख कोटींपेक्षा जास्त जीएसटी संकलित होत आहे. याद्वारे सरकारला भरघोस उत्पन्न मिळत आहे. मात्र यामध्ये राज्य सरकारांचा सुद्धा हिस्सा आहे. केंद्र सरकार मात्र राज्यांना जीएसटीचे त्यांच्या हक्काचे पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे. विशेष करून काँग्रेसशासित राज्यांच्या बाबतीत राजकारण केले जात आहे. या राज्यांना अजूनही जीएसटीची थकीत रक्कम मिळालेली नाही, असा आरोप चिदंबरम यांनी केला आहे. चिदंबरम यांनी याआधी अनेक वेळा केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. कोरोना लसींच्या संदर्भातही त्यांनी ऑडीट करण्याची मागणी केली होती.

Advertisement

दुसरीकडे मात्र केंद्र सरकार राज्यांना जीएसटी रक्कम दिल्याचा दावा करत आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमके कोण खरे बोलत आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. राज्ये जीएसटीच्या थकबाकीची मागणी करत आहेत. मात्र, केंद्र सरकार असा दावा करत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply