Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. आले का ‘तेही’ संकट; पहा ब्लॅक, यलो आणि व्हाइटनंतर कोणती बुरशी आलीय..!

दिल्ली : कोरोनाचे संकट कमी म्हणून की काय त्यानंतर बुरशीच्या आजाराने आक्रमण केले आहे. आतापर्यंत ब्लॅक, यलो आणि व्हाइट फंगसचे रुग्ण आढळत होते. आता मात्र ‘ग्रीन फंगस’ हा आणखी एक आजार आला आहे. मध्य प्रदेश राज्यातील इंदोरमध्ये या आजाराचा पहिला रुग्ण सापडला आहे. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.

Advertisement

या रुग्णाच्या फुफ्सुसांची तपासणी केली असता हा प्रकार समोर आला आहे. तपासणी दरम्यान या रुग्णाच्या फुफ्फुसात एक ग्रीन कलरचा फंगस दिसला. त्यामुळे रंगाच्या आधारे यास नाव देण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. देशात ‘ग्रीन फंगस’ चा हा पहिलाच रुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. या रुग्णावर सध्या मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. कोरोना बाधित झाल्यानंतर रुग्णात पोस्ट कोविडची लक्षणे दिसून आली. दीड महिन्यांआधी त्यास रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असले तरी त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. ताप जास्त येत होता. त्यामुळे या रुग्णास पुढील उपचारांसाठी मुंबईला पाठवण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाइटने याबाबत वृत्त दिले आहे.

Advertisement

देशात कोरोना विषाणूचा धोका अजूनही कायम आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांना आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. नवीन आजार उद्भवण्याचे प्रमाण या रुग्णांमध्ये वाढले आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या अध्ययनातही असेच दिसून आले आहे. त्यामुळे धोका वाढला आहे. कोरोनानंतर ब्लॅक फंगसच्या (काळी बुरशी) आजाराचे सर्वाधिक रुग्ण अनेक राज्यात आढळून येत आहेत. हा आजार सुद्धा अतिशय घातक ठरत आहे. या आजाराची वाढती तीव्रता पाहता काही राज्यांनी यास महामारी म्हणून घोषित केले आहे. ब्लॅक फंगस नंतर यलो फंगस आणि व्हाइट फंगसचेही रुग्ण आढळले आहेत. मात्र, या आजारांचे प्रमाण फारसे नाही. त्यानंतर आता ग्रीन फंगसचाही रुग्ण आढळला आहे. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.

Advertisement

दरम्यान, देशात आता दुसऱ्या लाटेचा जोर बराच कमी झाला आहे. रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण सुद्धा कमी झाले आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसही दिलासा मिळाला आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याने देशातील अनेक राज्यांनी निर्बंधात सवलती देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply