Take a fresh look at your lifestyle.

महत्वाची माहिती : तर टाळू शकतो मुलांच्या करोनाचा धोका; पहा नेमके काय म्हटलेय डॉक्टरांनी

अहमदनगर : कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये वृद्धांना आणि दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूने तरुणांना घेरले होते. आता संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना त्रास होऊ शकतो असे म्हटले जात आहे. संगमनेर येथील बालरोगतज्ञ डॉ. राजेंद्र खताळ यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Advertisement

जागतिक आरोग्य संघटनेने असा इशारा दिल्याने अनेकांना तिसऱ्या लाटेची मोठी भीती वाटत आहे. मुले म्हणजे आपली पुढची पिढी. तिला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. अशावेळी योग्य ती खबरदारी व काळजी घेतली तर लहान मुलांच्या कोरोना संसर्ग बाबतीतील धोका टळू शकतो असे डॉ. खताळ यांना वाटते. अकोले अभिनव शिक्षण संस्था व अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल युवा प्रबोधन वेबिनॉरमध्ये मार्गदर्शन करताना त्यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी अकोले येथील बालरोगतज्ञ डॉ. संदेश भांगरे व डॉ. दर्शन बंगाळ यांनीही मार्गदर्शन केले.

Advertisement

अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, कार्यकारिणी सदस्य आरीफ तांबोळी आदींसह शिक्षक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. त्यामध्ये पालकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना डॉक्टरांनी मांडलेले मुद्दे असे :

Advertisement
६ महिने ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांना पावसाळी आजार व कोरोना एकत्रित झाले, तर त्या सर्वांचे उपचार करणे अवघड होऊ शकते म्हणून कोरोनाव्यतिरिक्त पावसाळी आजाराच्या अनुषंगाने असलेल्या सर्व लसीकरण डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्यावेत
तिसरी लाट लहान मुलांना बाधित होऊ शकते म्हणून संतुलित आहार देण्यात यावा. त्यामध्ये कार्बोहायड्रेसचे प्रमाण वाढवण्यासाठी व प्रोटिन्स मिळण्यासाठी पालेभाज्या, अंडी, चिकन, मासे, खजूर, कडधान्ये, डाळी, चपाती, बटाटे, दूध व दुग्धजन्य पदार्थ, पाण्याचे प्रमाण वाढवावेत
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून तहसीलदारांमार्फत बालरोगतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात १० ते १५ बेडचे कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी चालू केली आहे. गरजेनुसार अकोले व संगमनेर तालुक्यातुन एकत्रितच कोविड सेंटर सुरू करून एकमेकांशी उपचाराबाबत व इतर सहकार्याबाबत देवाणघेवाण करण्यात येणार आहे.

 

Advertisement

पालक पावसे, प्रा. डॉ. सुरींदर वावळे व संजय लाड, मधुकर नवले, जे. डी. आंबरे, प्रा. स्मिता पुंड, अभिनव व अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या आयटीआय विभागाचे प्रा. काशिनाथ गुंजाळ, प्रा. अशपाक पठाण, प्रा.स्मीता पुंड, राधिका नवले आदीही यावेळी उपस्थित होते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply