Take a fresh look at your lifestyle.

लसटंचाई व आरोग्याच्या मुद्द्यावर काँग्रेस झालीय आक्रमक; पहा नेमके काय गंभीर आरोप केलेत मोदी सरकारवर

मुंबई : देशात कोरोना प्रतिबंधक लस आणि लसीकरणाच्या मुद्द्यावर वाद सुरुच आहेत. आधी लसींची टंचाई आणि लसीकरणाच्या धोरणावरुन विरोधकांनी केंद्र सरकारला टार्गेट केले होते. आता एका नव्याच कारणामुळे केंद्र सरकार विरोधकांच्या रडारवर आले आहे. कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतरावरुन मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. दोन डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस तज्ज्ञांच्या समितीने केलीच नव्हती, असे आता समोर आले आहे. त्यामुळे विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. केंद्र सरकारने याबाबत तातडीने खुलासा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.

Advertisement

कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांवरुन १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय तज्ज्ञ गटाच्या शिफारसीनुसार घेतल्याचे सांगण्यात आले होते. आता मात्र अशी काही शिफारस केलीच नव्हती, आणि त्यास कोणताच वैज्ञानिक आधार नाही, असे तज्ज्ञ गटातील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. शास्त्रज्ञांनी असे सांगितल्यानंतर मात्र विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मोदी सरकारने हा निर्णय कशाचे आधारे आणि कोणाच्या सांगण्यावरुन घेतला, याचा खुलासा केला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Advertisement

‘दोन लसीमधील अंतर वाढवण्याचा निर्णय फक्त ‘कोविशील्ड’ लसीबाबतच का घेतला गेला ?, लसींच्या कमतरतेमुळे लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ आली आणि त्यामुळे मोदींची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून हा खटाटोप केला आहे का ?, लसीकरण मोहिमेत मोदी सरकारला आलेले अपयश लपवण्यासाठी हा निर्णय घेतला का ?, असे प्रश्न पटोले यांनी उपस्थित करत सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली.

Advertisement

केंद्र सरकारने लसीकरणासाठी राष्ट्रीय धोरण ठरवावे, अशी मागणी विरोधी पक्ष करत आहेत. मात्र, ‘मोदी सरकारकडे लसीकरणाचे राष्ट्रीय धोरणच नाही. देशातील नागरिकांच्या लसीकरणासाठी किती लसींची आवश्यकता आहे, याचे काहीच नियोजन केले नाही. त्याआधीच १८ आणि ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. लसीसाठी दोन कंपन्यांवर सरकार अवलंबून राहिले.’ त्यामुळे लसीकरण मोहिम फसल्याचे पटोले यांनी सांगितले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply