Take a fresh look at your lifestyle.

होय.. आलाय करोना अलार्मही; बाधित व्यक्तीच्या जवळ असल्यावर वाजणार ट्रिंग-ट्रिंग..!

मुंबई : जगभरात कोरोनाने वेगळीच दहशत निर्माण केली आहे. कुणी साधा खोकला किंवा त्यास ताप आला तरी त्यास कोरोना तर नसेल ना..असा संशय मनात येतोच. कारण, काही रुग्ण असे असतात की त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आजिबात दिसत नाहीत. कोरोनाची तपासणी केल्यानंतरत कळते की कोरोना आहे किंवा नाही. आता मात्र, ब्रिटनमध्ये असा भन्नाट अलार्म तयार करण्यात आला आहे, की आजूबाजूस जर एखादा कोरोना बाधित व्यक्ती असेल तर अलार्म अलर्ट करणार आहे.

Advertisement

Advertisement

ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी सीलिंक माउंटेड कोविड अलार्म तयार केला आहे. जो रुममधील कोरोना बाधित १५ मिनीटात माहिती देईल, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे. आज तक वृत्तवाहिनीने टाइम्स रिपोर्टसच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. केंब्रिजशायरमधील रोबो सायंटिफिकने तयार केलला हा सेन्सर त्वचेद्वारे निर्मित रसायने शोधून कोरोनाबाधित व्यक्ती ओळखू शकतो. हा सेन्सर कोरोना संक्रमित व्यक्तींच्या श्वासांमध्ये असलेल्या रसायनांचे विश्लेषण करुन परिणाम देतो. विशेष म्हणजे, कोरोना बाधित कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी हा सेन्सर अतिशय चाणाक्षपणे शोध घेऊ शकतो, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. चाचणीचे निकाल सुरुवातीच्या टप्प्यात आहेत.

Advertisement

हा प्रयोग यशस्वी झाला तर कोरोना बाधित रुग्ण फारच कमी वेळात शोधता येतील. सध्या आरटी-पीसीआर आणि अँटीजेन चाचणीद्वारे कोरोना आहे किंवा नाही, हे तपासले जाते. दरम्यान, जगभरात कोरोनाचा धोका पुन्हा वाढत आहे. अनेक देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. चीनमध्ये रुग्ण वाढत असल्याने काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन केला आहे. ब्रिटेनमध्ये कोरोना आटोक्यात आला होता. मात्र, आता परत रुग्ण वाढत आहेत. रशियाची राजधानी मॉस्को शहरातही रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे टेन्शन वाढले आहे.या देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुद्धा सुरू आहे.  अशातच कोरोनाा फैलाव सुद्धा वाढत चालला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply