Take a fresh look at your lifestyle.

भारतीयांनी दिलाय चीनला ‘असा’ही झटका; पहा कशा पद्धतीने मुजोर चीन होत आहे घायाळ..!

दिल्ली : गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकात जोरदार संघर्ष झाला होता. या घटनेस आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. भारतीय जवानांनी तर चीनचा प्रतिकार करत त्यास चांगलीच अद्दल घडवली. पण, या प्रकाराने खवळलेल्या भारतीय नागरिकांनीसुद्धा चीनला धडा शिकवला आहे. या संघर्षानंतर दोन्ही देशातील तणाव अजून निवळलेला नाही. याचा परिणाम दोन्ही देशांतील व्यापार आणि अन्य वाणिज्य क्षेत्रांवर पडला आहे. आर्थिकदृष्ट्या मजबूत असणाऱ्या चीनला झटका देण्याच्या उद्देशाने भारत सरकारने आत्मनिर्भर भारत अभियान सुरू केले.

Advertisement

तसेच सरकारने चिनी कंपन्यांच्या अनेक मोबाईल अॅप्लिकेशनवर सुद्धा बंदी घातली. यामुळे चीनला चांगलाच झटका बसला. नागरिकांनीसुद्धा चीनला काहीतरी धडा शिकवण्याचे मनोमन ठरवले होतेच. या घटनेमुळे आधीच लोक संतप्त झाले होते. त्यामुळे चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्यास सुरुवात करण्यात आली. या मोहिमेचा परिणाम असा झाला की, अनेक लोकांनी चिनी कंपन्यांऐवजी दुसऱ्या कंपन्यांच्या वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य दिले. दोन पैसे जास्त खर्च झाले तरी चालतील पण आता देशास धोका देणाऱ्या चीनच्या वस्तू नकोतच, असे म्हणत अनेकांनी या वस्तूंवर बहिष्कार टाकला. नोव्हेंबर 2020 मध्ये सणासुदीच्या दिवसात इंटरनेट मीडिया लोकल सर्कल मार्फत करण्यात आलेल्या एका सर्वेत असे दिसून आले की जवळपास 71 टक्के भारतीयांनी चीनच्या कोणत्याही वस्तू खरेदी केल्या नाहीत.

Advertisement

त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले होते. आता या लाटेचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वे करण्यात आला. या सर्वेत असे दिसून आले, की 43 टक्के लोकांनी मागील वर्षभराच्या काळात चीननिर्मित कोणत्याही वस्तू खरेदी केल्या नाहीत. या सर्वेत देशातील 281 जिल्ह्यातील 18 हजार लोकांना प्रश्न विचारण्यात आले होते. या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार अहवाल तयार करण्यात आला. दरम्यान, चिनी कंपन्यांचा आज जगभरात दबदबा निर्माण झाला आहे. मोबाइलच्या दुनियेत चीनच्याच कंपन्या आघाडीवर आहेत. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाबतीतबही अशीच परिस्थिती आहे. जगातील बहुतांश देशांच्या बाजारपेठा आज चीनने काबीज केल्या आहेत. इतकेच काय तर अमेरिकेसारख्या श्रीमंत देशातील बाजारपेठेतही चीनचा हस्तक्षेप वाढला आहे. अनेक गोष्टींच्या बाबतीत आज अमेरिकेलासुद्धा चीनवर अवलंबून रहावे लागत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply