Take a fresh look at your lifestyle.

खाद्यतेलाचे भाव कमी करण्यासाठी सरकारचा आहे ‘असा’ प्लान; पहा कशामुळे वाढलेत इतके भाव

मुंबई : देशात काही दिवसांपासून खाद्यतेलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यावेळी तेलाचे भाव इतके वाढले आहेत की कधीही दरवाढीचा विचार न करणारे नागरिक सुद्धा याचा विचार करू लागले आहेत. केंद्र सरकारला सुद्धा गंभीरपणे विचार करावा लागत आहे. खाद्यतेलांच्या किमती कमी करण्यासाठी तेलावरील आयात शुल्क कमी करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. खाद्यतेलाच्या किमती वाढण्यामागे काही कारणे आहेत. जागतिक पातळीवर होणाऱ्या घडामोडींचा परिणाम भारतावर होत आहे.

Advertisement

विदेशातून दरवर्षी एकूण मागणीच्या जवळपास ७० टक्के तेल विदेशातून मागवावे लागते. याचे कारण म्हणजे, देशात तेलाचे उत्पादन फारसे होत नाही. एकूण मागणीच्या ३० टक्केच तेल देशात तयार होते. त्यामुळे दुसऱ्या देशांतून तेल मागवावे लागते. या तेलासाठी दरवर्षी ८.५ ते १० अब्ज डॉलर्स खर्च होतात. एका अंदाजानुसार मागील वीस वर्षांच्या काळात भारतात पाम तेलाची आयात ४ दशलक्ष टनांवरुन १५ दशलक्ष टनापर्यंत वाढली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे जागतिक बाजारांतील घडामोडींचे परिणाम देशांतर्गत बाजारात होत आहे. आज देशात मोहरी, सोयाबीन, पाम तेल, सूर्यफूलाच्या तेलाचे दर खूपच जास्त वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पुरते कोलमडले आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीनेही समस्या वाढल्या आहेत. खाद्यतेलांच्या किमती मात्र ६० टक्क्यांपेक्षाही जास्त वाढल्या आहेत. या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकार आता तेलावरील आयात शुल्क कमी करण्याचा विचार करत आहे. असे केले तर तेलाच्या किमती काही प्रमाणात कमी होतील, असे सरकारला वाटत आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “#मराठा_आरक्षण आरक्षण : म्हणून मोदींच्या मनातील भावना महत्वाची; पहा नेमके काय म्हटलेत शाहू महाराज यांनी @krushirang https://t.co/iKKHj0UMeE” / Twitter

Advertisement

तेलाच्या किमती वाढण्यामागे काही कारणे आहेत. काही वर्षांपासून चीनची तेलाची मागणी वाढली आहे. या देशातील लोकांच्या आहारात बदल झाला आहे. त्यामुळे देशात तेलाची मागणी वाढली आहे. मागणी पूर्ण करण्यासाठी चीन मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी करत आहे. जगभरात सध्या तेलबिया पिकांच्या उत्पादनावर संकट निर्माण झाले आहे. दुष्काळामुळे अमेरिका आणि ब्राझील मधून सोयाबीनचा पुरवठा घटला आहे. तसेच दक्षिण पूर्व आशियाई देशातील पाम तेलाचे प्रकल्पात कोरोनामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. बायो डिझेलचा सुद्धा वापर वाढत चालला आहे. या काही कारणांमुळे सध्या खाद्यतेलांच्या किमती वाढल्या आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply