Take a fresh look at your lifestyle.

म्हणून चीन भडकला आणि दुतावासाने दिली ‘ती’ प्रतिक्रिया; पहा नेमके काय चालू आहे जागतिक राजकारणात

दिल्ली : ब्रिटनमध्ये आयोजित जी ७ राष्ट्रांच्या शिखर संमेलनात यंदा चीनला घेरण्यासाठी या देशांनी खास रणनिती तयार केली आहे. या संमेलनात चीनच्या संदर्भात काही मुद्दे उपस्थित करण्यात आले. या प्रकारानंतर चीन चांगलाच खवळला आहे. ब्रिटनमधील चिनी दूतावासाने अगदीच खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. या संमेलनात शिनजियांग, तैवान, हाँगकाँगच्या मुद्दे उपस्थित झाल्याने यास चीनने तीव्र विरोध केला आहे.

Advertisement

चिनी दूतावासाने म्हटले आहे, की कोरोना महामारीचे थैमान अजूनही सुरू आहे. जागतिक अर्थव्यवस्था सुद्धा संकटात आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी एकत्रित येणे आवश्यक आहे. विभाजनकारी राजकारणाची ही वेळ नाही. चीन हा एक शांतताप्रिय देश आहे. सहकार्यावर देशाचा विश्वास मात्र यासही काही मर्यादा आहेत, असा इशारा दिला आहे. चीनच्या अंतर्गत मुद्द्यांत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होता कामा नये. चीनची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, कोणत्याही अन्यायाचा मजबूतीने सामना करू, कोरोना विषाणूच्या उत्पत्तीच्या मुद्द्यावर राजकारण करू नये, असे दूतावासाने म्हटले आहे.

Advertisement

Advertisement

अमेरिका अशा पद्धतीने चीन विरोधात रणनिती तयार करत असताना चीनने मात्र आपल्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत. चीनने उलट अमेरिकेवरच आरोप केले आहेत. कोरोनाबाबत चीनने अजूनही बरीचशी माहिती जगाला दिलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने ज्यावेळी चीनचा दौरा केला होता, त्यावेळी सुद्धा चीनने त्यांना सर्व माहिती दिली नव्हती. तसेच कोरोना संदर्भात आतापर्यंत जे काही अहवाल आले आहेत, त्याद्वारे सुद्धा कोरोना विषाणू वुहान प्रयोगशाळेतूनच लीक झाल्याचा दावा केला आहे.

Advertisement

त्यामुळेच चीनवरील संशय आधिकच बळावला आहे. या संमेलनात सुद्धा या मुद्द्यावर चर्चा झाली. या प्रकरणी आधिक चौकशी करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. या संमेलनात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी चीन विरोधात आक्रमक धोरण घेतले होते. चीनची आर्थिक नाकाबंदी करण्यावरही चर्चा करण्यात आली. या प्रकाराने चीनचा तिळपापड झाला आहे. त्यामुळेच चीन संतप्त प्रतिक्रिया देत आहे. या राजकारणाचे भविष्यात काय परिणाम होतील, हे आताच सांगता येणे अशक्य आहे. मात्र, चीनच्या दादागिरीचा बंदोबस्त करण्यासाठी जगातील अनेक देश आता एकत्र येत आहेत, हे मात्र नक्की.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply