Take a fresh look at your lifestyle.

म्हणून जगातील दिग्गज टेक कंपन्यांनी घेतलाय हात आखडता; भारतात गुंतवणूक टाळण्याचा दिसतोय प्रयत्न..!

मुंबई : जगाची प्रमुख बाजारपेठ बनलेल्या भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची तयारी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी केलेली आहे. मात्र, देशातील बदलत जाणारे कायदे, कंपन्यांची साठमारी आणि बाहेरील देशांच्या कंपन्यांना प्रशासनाकडून होणारा त्रास याचा मोठा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. व्होडाफोन कंपनीबाबत घडलेली घटना आणि आता टेक कंपन्यांबाबत असलेल्या प्रशासकीय धोरणामुळे असे घडत असल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

सोशल मीडिया, आयटी व इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्मआधारित कंपन्यांना ग्राहक देणाऱ्या भारतात अनेक कंपन्या गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असतात. अमेरिकी व इतर बहुराष्ट्रीय टेक कंपन्या चीनच्या तुलनेत भारतालाच गुंतवणुकीसाठी प्राधान्य देत आहेत. या कंपन्या आयटी व प्रतिस्पर्धा कायद्यांमध्ये सरकारकडून कठोर पावले उचलले जाण्याच्या भीतीने हात आखडता घेण्यावर चर्चा करीत आहेत.

Advertisement

भीतीचे वातावरण झाले आहे. याचा परिणाम कंपन्यांचे धोरण व संचालन दोन्हींवर दिसत असल्याचे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे म्हणणे आहे. तर,  फेसबुक, ट्विटर किंवा कोणत्याही सोशल मीडिया अॅपवर नियंत्रण ठेवण्याचा सरकारचा हेतू नसल्याचे भारताच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नव्या आयटी नियमांद्वारे ओटीटी, ऑनलाइन मीडिया आणि सोशल मीडियाला नियंत्रित केले जात असल्याचे कंपन्यांना वाटत आहे. यावर केंद्र सरकार कसा तोडगा काढते यावर या बड्या कंपन्यांचे धोरण ठरणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply