Take a fresh look at your lifestyle.

कांदा घोटाळा : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीवर पवारांचे ‘महाराज्य’; पहा नेमका काय केलाय बट्ट्याबोळ..!

नाशिक / पुणे : सरकारी योजनेतून सामन्यांचा फायदा कमी आणि अधिकारी, कर्मचारी व तथाकथित पुढाऱ्यांचा फायदा जास्त होत असल्याची भारतीय परंपरा आहे. तसलाच प्रकार नाफेड या यंत्रणेच्या ‘फार्म गेट’च्या कांदा खरेदीत झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी नाफेडद्वारे सुरू असलेल्या योजनेतून पॉवरफुल अशाच व्यक्तींना ‘अच्छे दिन’ आल्याची चर्चा आहे.

Advertisement

दैनिक दिव्य मराठी यांनी बातमी प्रसिद्ध करून या खरेदीमध्ये झालेला कोट्यावधी रुपयांचा घोटाळा जगजाहीर केलेला आहे. त्यानुसार शेतकरी उत्पादक कंपन्या आणि नाफेडचे अधिकारी संगनमताने मोठा बट्ट्याबोळ केल्याचे म्हटले जात आहे. राज्यात महा-एफपीसी फेडरेशन, महाराज्य फेडरेशन आणि पृथाशक्ती फेडरेशन या तीन राज्यस्तरीय फेडरेशनद्वारे कांदा खरेदी केली जात असून त्यात महाराज्य फेडरेशनद्वारे खरेदी करण्याचा नवा प्रघात आलेला आहे. अवघ्या १४ कंपन्यांद्वारे सुरू असलेल्या महाराज्य फेडरेशनने या खरेदीत ठरलेले भाव न देणे, चाळीचे भाडे दडवणे, व्यापाऱ्यांचा कांदा शेतकऱ्यांचा कांदा म्हणून वळवणे असे धक्कादायक प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत.

Advertisement

Advertisement

यासह महाराज्य फेडरेशन यांचे सुरेश भीमराव पवार आणि त्यांच्या पत्नी व मुलगा यांच्याच शेतकरी उत्पादक कंपन्याचा या फेडरेशनमध्ये वरचष्मा आहे. स्वतः सुरेश पवार हे पाच कंपन्यामध्ये संचालक आहेत. तर, त्यांची पत्नी गोदावरी सुरेश पवार या ३ आणि मुलगा गणेश सुरेश पवार हे तब्बल ६ शेतकरी कंपन्यांचे संचालक असल्याचे स्पष्ट झालेले आहे. एकूणच या कांदा खरेदीत पवारांचे राज्य कायम असल्याचे यातून स्पष्ट दिसत आहे. मात्र, आता ही कांदा खरेदी, कंपन्याची निवड आणि शेतकऱ्यांच्या तक्रारी यावर चौकशी झाल्यावरच या चर्चेचा खरे-खोटेपणा स्पष्ट होणार आहे.

Advertisement
महाराज्य फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश भीमराव पवार संचालक असलेल्या कंपन्या
जीएसपी डेअरी अँड अॅग्रो प्रायव्हेट लि.
पांझरा परिसर शेतकरी उत्पादक कंपनी
कसमादे परिसर अॅग्रो प्रोड्युसर कंपनी
कसमादे मल्टिपर्पज निधी कंपनी
महाराज्य शेतकरी उत्पादक कंपनी
गणेश सुरेश पवार संचालक असलेल्या कंपन्या
कसमादे परिसर अॅग्रो प्रोड्युसर कंपनी
जीएसपी डेअरी व अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी
महाराज्य ग्रुप ऑफ फार्मर प्रोड्युसर कंपनी
मोसम खोरे फार्मर प्रोड्युसर कंपनी
कसमादे मल्टिपर्पज निधी लिमिटेड कंपनी
देवमामलेदार फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड
गोदावरी सुरेश पवार संचालक असलेल्या कंपन्या
पांझरा परिसर फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड
कसमादे परिसर अॅग्रो प्रोड्युसर कंपनी
जीएसपी डेअरी अँड अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी

 

Advertisement

दरम्यान, नाशिक, नगर आणि पुण्यातील शेतकऱ्यांकडून आम्ही कांदा खरेदी महाराज्य फेडरेशन करीत असून फेडरेशनच्या ५० कंपन्या आहेत. नावे सारखी असली तरी कंपन्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या अाहेत.‘नाफेड’च्या सिस्टिमनुसारच अाम्ही काम चालू असल्याचा दावा सुरेश पवार (संचालक, महाराज्य फेडरेशन) यांनी केलेला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply