Take a fresh look at your lifestyle.

कांदा घोटाळयामुळे हादरला महाराष्ट्र; ‘नाफेड’कडून मिळेना माहिती, उलटसुलट चर्चेला उधाण

मुंबई / पुणे : नाफेडद्वारे सुरू असलेल्या ‘फार्म गेट’ खरेदीत काही “ऑफलाइन’ शेतकरी उत्पादक कंपन्या आणि नाफेडचे अधिकारी यांनी संगनमताने कोट्यवधींचा घोटाळा केल्याची बातमी आल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने दर स्थिरीकरण योजनेतून होत असलेल्या खरेदीबाबत नाफेड अधिकारी स्पष्ट माहिती देत नसल्याने यामधील संशयास्पदता वाढत आहे.

Advertisement

राज्यात महा-एफपीसी फेडरेशन, महाराज्य फेडरेशन आणि पृथाशक्ती फेडरेशन या तीन राज्यस्तरीय फेडरेशनद्वारे कांदा खरेदी केली जात आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या फेडरेशनच्या वतीने सुरू असलेल्या या खरेदीत पारदर्शकता न बाळगल्याने शेतकऱ्यांनी तक्रारी सुरू केलेल्या आहेत. व्यापाऱ्यांचा कांदा शेतकऱ्यांचा कांदा दाखविणे, ठरलेल्या भावापेक्षा कमी किंमत देणे आणि चाळींच्या भाड्यातही अनियमितता आदि तक्रारी आणि आरोप महाराज्य फेडरेशनवर होत आहेत.

Advertisement

Advertisement

याबाबत माहिती देताना ‘दिव्य मराठी’ला शैलेंद्र कुमार (पिंपळगाव शाखा व्यवस्थापक, नाफेड) यांनी म्हटले आहे की, आम्हाला सर्वांसोबतच काम करायचे आहे, अधिकाधिक टार्गेट पूर्ण करायचे आहे. जे जास्तीत जास्त खरेदी करून देतील त्यांच्यासोबत आम्ही काम करीत आहोत. कोणामार्फत किती व कशी खरेदी करताे, त्याच्या अटी-शर्तींची माहिती अाम्ही देऊ शकत नाही. तर, यामध्ये सर्वाधिक खरेदी केली जात असलेल्या महाराज्य फेडरेशन यांनीही ‘नाफेड’च्या सिस्टिमनुसारच अाम्ही काम करीत असल्याचे म्हटलेले आहे.

Advertisement

१४ कंपन्यांद्वारे सुरू असलेल्या महाराज्य फेडरेशनने या खरेदीबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत. यासह महाराज्य फेडरेशन यांचे सुरेश भीमराव पवार आणि त्यांच्या पत्नी व मुलगा यांच्याच शेतकरी उत्पादक कंपन्याचा या फेडरेशनमध्ये वरचष्मा आहे. स्वतः सुरेश पवार हे पाच कंपन्यामध्ये संचालक आहेत. तर, त्यांची पत्नी गोदावरी सुरेश पवार या ३ आणि मुलगा गणेश सुरेश पवार हे तब्बल ६ शेतकरी कंपन्यांचे संचालक असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

दरम्यान, नाशिक, नगर आणि पुण्यातील शेतकऱ्यांकडून आम्ही कांदा खरेदी महाराज्य फेडरेशन करीत असून फेडरेशनच्या ५० कंपन्या आहेत. नावे सारखी असली तरी कंपन्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या अाहेत.‘नाफेड’च्या सिस्टिमनुसारच अाम्ही काम चालू असल्याचा दावा सुरेश पवार (संचालक, महाराज्य फेडरेशन) यांनी केलेला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply