Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. झालाय कोट्यावधींचा कांदा घोटाळा; पहा नेमका काय प्रकार केलाय ‘फार्म गेट’मध्ये

नाशिक : फार्म गेट’ खरेदीत काही ‘ऑफलाइन’ शेतकरी उत्पादक कंपन्या आणि नाफेडचे अधिकारी यांनी संगनमताने कोट्यावधी रुपयांचा कांदा घोटाळा केल्याचा संशय आहे. याबाबत दैनिक दिव्य मराठी यांनी बातमी प्रसिद्ध करून अधिकारी, कंपन्या आणि खरेदीमधील घोटाळयाचे डीटेल्स जगजाहीर करून टाकले आहेत. नाशिक येथील पत्रकार दीप्ती राऊत यांच्या बातमीने कांदा आणि एकू शेतमालामध्ये सुरू आलेला गोरखधंदा जगजाहीर झालेला आहे.

Advertisement

सदर फेडरेशनने ‘नाफेड’च्या सिस्टिमनुसार काम सुरू असल्याचा दावा नाफेडच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, अधिकचा तपशील देण्यास टाळाटाळ केलेली आहे. तर, यामुळे कांदा खरेदीभोवतीचा संशय वाढला आहे. आता यावर राज्य आणि केंद्राचे कृषीमंत्री आणि प्रशासकीय यंत्रणा कोणती कार्यवाही करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पावसाळ्यानंतर वाढणारे कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी नाफेडद्वारे सुरू असलेल्या ‘फार्म गेट’ खरेदीत हा घोटाळा झालेला आहे.

Advertisement

Advertisement

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने दर स्थिरीकरण योजना राबवून कांदा आणि डाळी खरेदी करण्यासाठी २७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. नाफेडद्वारे महाराष्ट्रातून १.५ लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठरवून एप्रिलपासून खरेदी चालू आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या फेडरेशनच्या वतीने सुरू असलेल्या या खरेदीत पारदर्शकता बाळगलेली नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. व्यापाऱ्यांचा कांदा शेतकऱ्यांचा कांदा दाखविणे, ठरलेल्या भावापेक्षा कमी किंमत देणे आणि चाळींच्या भाड्यातही अनियमितता करणे आदि प्रकार यामध्ये संगनमताने केले जात आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply