Take a fresh look at your lifestyle.

झेडपी-पंचायत समिती निवडणुकीसाठी कार्यवाही चालू; पहा गटांच्या आरक्षणात बदलाचे काय होणार..!

नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राजकीयदृष्ट्या चाचपणी करणे आणि त्यानुसार बेरजेचे राजकारण जुळवणे यासाठीचा खेळ आता राज्यभरात चालू झालेला आहे. अनेकांनी आरक्षणानुसार आपण कुठे आणि कोणाकडून लढायचे याचीही तयारी सुरू केलेली आहे. मात्र, अजूनही त्याबाबत स्पष्टता नसल्याने इच्छुक असूनही अनेकांनी शांत राहण्याचे धोरण ठेवले आहे. त्यांच्यासह कार्यकर्त्यांना कामाला लावणारी ही बातमी आहे.

Advertisement

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्र पाठवून २०११ च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्येची माहिती तातडीने सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ग्रामीण लोकसंख्येमधून नव्याने स्थापन झालेल्या नगरपालिका, नगरपंचायती व महापालिकेच्या हद्दवाढ क्षेत्राची लोकसंख्या वगळून तालुकानिहाय ग्रामीण लोकसंख्येची माहिती सादर करण्याच्या सूचना आल्याने आता पुढील काळात काही ठिकाणाचे प्रवर्गनिहाय आरक्षण बदलतील असेही म्हटले जात आहे.

Advertisement

२६ जिल्हा परिषद व २८३ पंचायत समित्यांची मुदत मार्च २०२२ मध्ये संपणार असल्याने तत्पूर्वी याच्या निवडणुका घेण्याची कार्यवाही करावी लागणार आहे. निवडणुका घेण्यासाठी आणि सदस्य संख्या निश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील २०११ च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्येची माहिती आधार म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे. त्याबाबतच्या माहितीनुसार मग पुढे गट आणि गण यासह त्याचे आरक्षण ठरणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply