Take a fresh look at your lifestyle.

‘त्यावेळी’ होणार शाळेला सुरुवात; पहा नेमके काय म्हटलेय शिक्षणमंत्र्यांनी

मुंबई : राज्य सरकारने 15 जून रोजी सर्व शाळा सुरू करण्याचे आदेश दिले असतानाही शाळा कशा पद्धतीने सुरू करायच्या याविषयी जारी केलेल्या परित्रकात कोणत्याच मार्गदर्शक सुचना दिल्या गेल्या नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे. त्यावर आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, सध्या शाळा न सुरू करता फक्त ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवणार आहोत. तसेच येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. एकूणच मंत्र्यांनी याबाबत अजूनही ठोस तारीख किंवा धोरण जाहीर केलेले नाही. त्यामुळे या करोनाच्या संकट कालावधीत शाळा कधी आणि कशा सुरू होणार याबाबत संभ्रम कायम आहे. कोरोनाची परिस्थिती काहीशी निवळली असल्यामुळे सरकारने शाळा सुरू करण्याचे आदेश दिले गेले. मात्र, पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची शाळा कशी सुरू करायची, विद्यार्थी व शिक्षक यांची काळजी कशी घ्यायची, हेच प्रश्न अनुत्तरीत असल्याने यावर कार्यवाही होऊ शकलेली नाही.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply