Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. चीनच्या ‘त्या’ बेजबाबदारणामुळे अवघे जग चिंतेत; पहा नेमका काय घोळ करून ठेवलाय त्यांनी

दिल्ली : अवघ्या जगास कोरोनाच्या भयानक संकटात ढकलणाऱ्या मुजोर चीनच्या वागण्यात काहीही बदल झालेला नाही. आताही चीनच्या अशाच एका बेजबाबदारणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, त्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. एका अहवालानुसार चीनच्या न्यूक्लिअर पावर प्रकल्पात लीकेज झाल्याचे समोर आले आहे.

Advertisement

चीनमधील या कंपनीत फ्रान्सची कंपनी भागीदार आहे. या कंपनीनेच लीकेजमुळे संभाव्य रेडिओलॉजीकल धोक्याबाबत इशारा दिला होता.  फ्रेंच कंपनीने युएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जीस याबाबत पत्रही पाठवले आहे. ‘सीएनएन’ ने या प्रकाराचा खुलासा केला आहे. या कंपनीने पाठवलेल्या पत्रानंतरही अमेरिकेच्या बायडेन प्रशासनास असे वाटत आहे, तेथील परिस्थिती अद्याप आवाक्याबाहेर गेलेली नाही. नागरिकांसाठी धोका नाही. चीन आणि फ्रान्सच्या कंपनीने २००९ मध्ये ताइशन प्रकल्प सुरू केला होता. त्यानंतर २०१८ आणि २०१९ मध्ये येथे वीज निर्मितीस सुरुवात करण्यात आली होती. चीनमध्ये मागील काही वर्षांपासून परमाणू उर्जेचा वापर वाढला आहे. चीनच्या न्यूक्लिअर एनर्जी असोसिएशननुसार देशात आजमितीस १६ न्यूक्लिअर प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांद्वारे ५१ हजार मेगावॉट वीज तयार केली जात आहे. हा प्रकार अशा वेळी समोर आला आहे, की ज्यावेळी जी ७ देश चीनच्या विरोधात मोर्चेबांधणी करत आहे. त्यामुळे अमेरिका चीनवरच जास्तच लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे चीनची डोकेदुखी वाढणार आहे.

Advertisement

याआधी कोरोनाबाबत चीनने अजूनही बरीचशी माहिती जगाला दिलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने ज्यावेळी चीनचा दौरा केला होता, त्यावेळी सुद्धा चीनने त्यांना सर्व माहिती दिली नव्हती. तसेच कोरोना संदर्भात आतापर्यंत जे काही अहवाल आले आहेत, त्याद्वारे सुद्धा कोरोना विषाणू वुहान प्रयोगशाळेतूनच लीक झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळेच चीनवरील संशय आधिकच बळावला आहे. आता चीनमध्ये घडलेल्या या प्रकाराने जगभरात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर प्रकल्पात लीकेज झाले असले तरी ते फार धोकादायक नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेने चीनची कोंडी करण्यासाठी आक्रमक रणनिती तयार केली आहे. जी ७ देशांच्या संमेलनातही याचा प्रत्यय आला. चीनच्या वन बेल्ट रोड प्रकल्पास टक्कर देण्यासाठी नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार केला जात आहे. असे प्रत्यक्षात घडले तर चीनसाठी तो मोठा धक्का असेल.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply