Take a fresh look at your lifestyle.

फ़क़्त ११ मिनिटात झालाय ‘तो’ घोळ; पहा रामभक्तांच्या देणगीची लुट केल्याचा होतोय आरोप

दिल्ली : देव असो की धर्म त्यामध्ये सुरू असणारे अर्थकारण हाच कळीचा मुद्दा बनलेला आहे. तसाच प्रयत्न अयोध्येत राममंदिराची उभारणीसाठी सक्रीयपणे काम करणारी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राने (ट्रस्ट) यांनी केल्याचा आरोप होत असल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. फ़क़्त ११ मिनिटात मोठा घोळ झाल्याचा कागदोपत्री पुरावा देऊन यावर टीका सुरू झालेली आहे.

Advertisement

Advertisement

जमीन खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे नेते तथा माजी मंत्री पवन पांडेय यांनी केल्याने देशभरात खळबळ उडालेली आहे. अकरा मिनिटांपूर्वी जी जमीन दोन कोटी रुपयांत विकली गेली तीच जमीन ट्रस्टने १८.५ कोटी रुपयांत खरेदी केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. जमीनीच्या या दाेन्ही व्यवहारांत डाॅ. अनिल मिश्रा हेच साक्षीदार क्रमांक १ राहिले आहेत. डाॅ. मिश्रा हेच ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांचे ‘सायनिंग अॅथाॅरिटी’ असल्याचे आरोप होत आहे. याबाबत ट्विटरवर अनेक कागदपत्रे शेअर केली गेली आहेत.

Advertisement

(1) Ranvijay Singh on Twitter: “कुसुम से सुल्तान ने 2 करोड़ में जमीन खरीदी सुल्तान से ट्रस्ट ने 18 करोड़ में जमीन खरीदी एक ही जमीन, 10 मिनट में 2 करोड़ से 18 करोड़ में खरीदी गई. पूर्व मंत्री पवन पांडेय का यही आरोप है. https://t.co/LHVH7HpIHa” / Twitter

Advertisement

ट्रस्टने १८ मार्च रोजी १८.५ कोटी रुपयांत सुलतान अन्सारी व रविमोहन तिवारी यांच्याकडून जमीन खरेदी केली. विशेष म्हणजे हीच जमीन ११ मिनिटांपूर्वी हरीश पाठक आणि कुसुम पाठक यांच्याकडून दोन कोटी रुपयांत खरेदी करण्यात आली होती. म्हणजे केवळ ११ मिनिटांत ही जमीन १६.५ कोटी रुपयांनी महाग झाल्याचा आरोप संजय सिंह रविवारी लखनऊ येथे केला आहे. श्रीराम भक्तांकडून मिळालेल्या दानाची ही सर्रास लूट असून जमीन खरेदी केली गेली त्याचा ई-स्टॅम्प ५.११ वाजता खरेदी केला गेला. जेव्हा की रविमोहन तिवारी यांनी जी जमीन हरीश पाठककडून खरेदी केली त्यासाठी ई-स्टॅम्प ५.२२ वाजता खरेदी केला गेला. त्यामुळे ट्रस्टने जमीन खरेदीसाठी ट्रस्टने आधीच ई-स्टॅम्प कसा खरेदी केला, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Advertisement

जमिनीसाठी ट्रस्टने १७ कोटी रुपयांचे आरटीजीएस केले आहे. हे पैसे कुणा कुणाच्या खात्यात जमा झाले, याची आणि लोकांच्या धार्मिक भावनांशी विश्वासघात करणाऱ्या या प्रकरणाची सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) तसेच सीबीआयकडून करण्याची मागणी समाजवादी पार्टीचे नेते पवन पांडेय यांनी अयोध्येत केली आहे. त्यामुळे आता यावर केंद्रातील सत्ताधारी भाजप नेमकी कोणती भूमिका घेतो याकडे जगाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply