Take a fresh look at your lifestyle.

मराठा आरक्षण : राजांनी बैठकीनंतर म्हटलेय असे; सरकारला दिलाय ‘तो’ महत्वाचा इशारा

पुणे : मराठा आरक्षण हा मुद्दा सध्या खूप तापलेला आहे. यावरून राज्यभरात उलटसुलट पद्धतीने राजकारण केले जात आहे. परिणामी यावर तोडगा निघत नसल्याने मराठा तरुण आक्रमक होण्याची शक्यता आहे. तोच धागा पकडून खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यात आपली भावना व्यक्त केली आहे.

Advertisement

राज्यकर्त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. आजचे राजकारणी व्यक्तीकेंद्रीत झाले आहेत. त्यामुळे उद्या समाजाचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार कोण, असा खडा प्रश्न खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात पुण्यात बैटक झाली. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, संभाजीराजे किंवा मी दुफळी निर्माण केली नाही. राज्यकर्त्यांना आरक्षण द्यायचे असते तर मागेच दिले असते. त्यांची इच्छाशक्तीच नाही. राजकारणी व्यक्तीकेंद्रीत झालेत. उद्या जर तरुणांचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार ते असतील.

Advertisement

माझा संभाजीराजेंना पाठइंबा आहे. मराठ्यांना आरक्षण हे एकच ध्येय आहे. राज्यकर्त्यांना फार मुभा दिली. मंडल आयोगाने ओबोसींना आरक्षण दिले. त्यावेळी मी दिल्लीतच होतो. तेव्हा दिल्लीत आरक्षण विरोधक आणि समर्थकांची रस्त्यावरच भोसकाभोसकी सुरु होती, याची आठवण त्यांनी सांगितली आहे.  उद्या जर तरुणांचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार ते असतील. त्यावेळी ना उदयनराजे, ना संभाजीराजे हा उद्रेक थांबवू शकणार नाहीत. आम्ही दोघे आडवे पडलो तरी आमच्यावर घणाघात होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply