Take a fresh look at your lifestyle.

मराठा आरक्षण : आता भाजपकडून संभाजीराजे छत्रपती हेच लक्ष्य; चंद्रकांतदादांनी म्हटले आहे ‘असे’..!

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाल मराठा आरक्षण रद्द झाल्याने मराठा जातीच्या समाजामध्ये असलेली भावना खूप तीव्र आहे. समाजाची भावना आणि तरुणांचे शिक्षण व रोजगाराचे प्रश्न लक्षात घेऊन राज्य सरकारने यावर तातडीने योग्य कार्यवाही करण्याचे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सध्या धरसोड वृत्ती सोडून भाजपची मराठा आरक्षणासंदर्भातील बाजू भक्कमपणे राज्यापुढे मांडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. दादांनी आपल्याच पक्षाच्या खासदारांच्या विरोधात असे बोलल्याने अनेकांना इतर प्रश्न पडले आहेत.

Advertisement

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेली ठाम भूमिका कमकुवत करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत, असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच पुढे म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या मूलभूत प्रश्‍नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. न्यायालयाने आरक्षणाच्या विरोधात निकाल दिल्यावर या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी सध्या चालढकल केली जात आहे. त्याचवेळी तज्ञांची समिती नेमून व केंद्र सरकारने केवळ दोन दिवसांत पुनर्विचार याचिका दाखल केली. मराठा आंदोलनाविषयी ठाम भूमिका जनतेसमोर मांडून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यभरातून लोकप्रतिनिधींना यासाठी एकत्र आणण्याचे प्रयत्न करावेत.

Advertisement

मराठा समाजातील मुलांना ज्या सवलती दिल्या जात नाहीत त्या देण्यास नेमकी राज्य सरकारची काय अडचण आहे, असा प्रश्न त्यांनी केला आहे. पुढे म्हटले आहे की, लोकसभेने १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर राज्यांना आरक्षण देण्यास अधिकार दिला आहे. मराठा आरक्षणाचे बिल राज्यपालांकडून राष्ट्रपतींकडे पाठवावे लागेल. या प्रक्रियेला सुमारे चार वर्षांचा कालावधी लागू शकतो. या कालावधीत मराठा समाजातील तरुणांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. या कालावधीत मॅनेजमेंट कोट्यातून मेरिटद्वारे ६ टक्के, तर ओपनमधून ९ टक्के असे आरक्षण सहजपणे देता येईल. या विद्यार्थ्यांची अतिरिक्त शुल्क भरण्यास राज्य शासनाला कोणताही विरोध होणार नाही.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply