Take a fresh look at your lifestyle.

मराठा आरक्षण : दोन्ही राजांमध्ये बैठकीला सुरुवात; अजितदादांनी घेतली शाहू महाराज यांची भेट

पुणे : मराठा आरक्षण रद्द झाल्याने सामाजिक भावना तीव्र झाल्याने राजकारण जोमात आहे. त्याच भावनेचा आदर राखून राज्य सरकारने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी राज्यभरातून होत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 16 जूनला कोल्हापुरातून मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या चर्चेस सुरुवात झाली आहे.

Advertisement

पुण्यातील या बैठकीला सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात त्याचे तीव्र प्रतिसाद उमटले आहेत. संभाजीराजे छत्रपतींनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घेऊन राज्यभर दौरे केले आहेत. मराठा आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून संभाजीराजे यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांनाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी लक्ष्य केलेले आहे. त्यामुळे आता त्यावर संभाजीराजे छत्रपतींची काय प्रतिक्रिया येते, याकडेही राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची न्यू पॅलेज इथे भेट घेतली आहे. भेटीनंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, भेटीत अजित पवारांसोबत सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. मराठा समाजासाठी जेवढे काही करणे शक्य आहे, तेवढे सरकारने करावे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावर निकाल दिला, तो निकाल पुन्हा एकदा अभ्यासला पाहिजे. समजून घेतला पाहिजे आणि जेवढं शक्य असेल ते सगळं केले पाहिजे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply