Take a fresh look at your lifestyle.

आणि ‘त्या’ जगप्रसिद्ध कंपनीची ‘ती’ महागडी गाडीच तुटून पडली; अपघातात झाला तिघांचा मृत्यू

a Kia Seltos was involved in a massive accident on the Chhindwara-Nagpur highway, the pictures of which were widely circulated on social media. The sad and tragic accident which resulted in multiple fatalities saw the SUV split in half, torn from the curbside B-pillar to the driver’s side C-pillar.

नाशिक : कारच्या बाजारात नव्यानेच पाऊल ठेवलेल्या किया मोटर्सला भारतीयांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. याच कंपनीच्या एका कारला जोरदार अपघात होऊन कराचे थेट दोन तुकडे झाल्याची घटना घडली आहे. सुप्रसिद्ध ब्लॉगर रवी रंजन यांनी याचे ट्विट केले आहे.

Advertisement

मध्यप्रदेश राज्यातील छिंदवाडा येथील महामार्गावर झालेल्या एका अपघाताचे फोटो त्यांनी शेअर केलेले आहेत. तसेच पुढे म्हटले आहे की, संबंधित सेगमेंटमधील एक सर्वात महाग आणि सर्वाधिक विक्री करणाऱ्या एसयूव्हीचे अपघातात मधून 2 तुकडे झाले. कारमधील 5 पैकी 3 लोकांचा जागीच मृत्यू झाला आणि 2 जण गंभीर आहेत. सेफ्टीबद्दल बोलणे व्यर्थ आहे. केवळ ग्राहकांना फसविले तर जात नाही? ही घटना मध्य प्रदेशातील छिंदवाडाची आहे. एकूणच भीषण अपघातात कारचे तुकडे पडल्याची ही घटना सध्या ट्रेंडमध्ये आलेली आहे.

Advertisement

Ravi Ranjan on Twitter: “अपने सेग्मेंट की एक सबसे महँगी और सबसे ज़्यादा बिकने वाली SUV #KiaSeltos एक ऐक्सिडेंट में टूट कर बीच से2टुकड़े हो गयी…कार में सवार 5 लोगों में से 3 की स्पॉट डेथ हो गई और 2 सीरीयस हैं। सेफ़्टी की बात ब्यर्थ है,सिर्फ ग्राहक को बेवकूफ बनाते है!ये घटना छिंदवाड़ा,मध्य प्रदेश की है https://t.co/LtLvFC7ORy” / Twitter

Advertisement

22 हजारांपेक्षा जास्त लोकांनी त्या पोस्टवर लाईक केलेले आहे. तर, अनेकांनी कार कंपन्या आणि त्यांच्या ग्राहक सेवा याबाबत आपापले अनुभव शेअर केलेले आहेत. यावर नरेंद्र यादव यांनी म्हटले आहे की, माझ्याकडे मारुती कंपनीची बालेनो ही कार आहे. एकदा गायीने फ़क़्त शेपूट मारले आणि गाडीचा पत्रा बेंड झाला. हा दोष त्या कंपन्यांचा नाही. दोष या कंपन्यांना परवाना देणाऱ्या सरकारमध्ये बसलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आहे. भारतात जनावरांपेक्षा स्वस्त माणसाचा जीव झालेला आहे. तर, आयुष त्यागी म्हणतात की, मारुती कंपनीची तिथे कार असती तर कदाचित रस्त्यावर खरचटली असती. पण सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही इतर कंपनी फोक्सवेगन आणि टाटापेक्षा चांगली नाही.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply