Take a fresh look at your lifestyle.

म्हणून अनलॉकींग स्पीड कमी करण्याचा मुद्दा आलाय पुढे; पहा नेमके काय म्हटलेय तज्ञांनी

मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याने राज्यांनी अनलॉक करण्यास सुरुवात केली आहे. अनेक राज्यात निर्बंधात सवलती देण्यात येत आहेत, त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी कोरोनाचा धोका सुद्धा वाढला आहे. कारण, अनलॉक केल्यानंतर अनेक शहरात रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सरकारचे टेन्शन वाढले आहे. रुग्ण वाढत राहिले पुन्हा लॉकडाऊन होणार, का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जात आहे.
देशातील सध्याची परिस्थिती पाहता तज्ज्ञांनी सुद्धा गंभीर इशारा दिला आहे. देशातील अनलॉकींगचा वेग काही प्रमाणात कमी करण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

कोरोना आटोक्यात येत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. याच काळात राज्ये निर्बंध कमी करत अनलॉक करत आहे. यामुळे मात्र धोका पुन्हा वाढत चालला आहे. ज्या जिल्ह्यात कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला होता त्या जिल्ह्यात रुग्ण वेगाने वाढत असल्याचे दिसून आले आहे. निर्बंध कमी केल्याचा हा परिणाम असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. एम्स मेडिसिन विभागाचे डॉ. नवीन विग म्हणाले, की अनलॉकचा हळूहळू करणे आवश्यक आहे. देशात ज्या ठिकाणी हॉटस्पॉट आहेत, तेथे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. कोरोनाबाबत सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन व्हायला हवे. देशात आजही 80 तस 85 हजारांच्या आसपास रुग्ण सापडत आहेत. म्हणजेच, कोरोनाचा धोका अजूनही आहे. अशा परिस्थितीत कोरोना प्रतिबंधात्मक नियम आणि मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. अनलॉकिंगबाबत योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. वेगाने अनलॉक केले तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या पाहता काळजीपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे.

Advertisement

दरम्यान, राज्यात दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाल्यानंतर राज्य सरकारने ७ जून पासून पाच टप्प्यात अनलॉक केले आहे. निर्बंधांत सवलती मिळाल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असली कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागला आहे. ज्या जिल्ह्यात कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला होता. तेथे पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. नागरिांची गर्दी वाढली आहे. तसेच नियमांचे पालन करण्याकडे सुद्धा दुर्लक्ष होत आहे. परिणामी नव्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारचे टेन्शन वाढले आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनांना दिले आहेत. मात्र, आता काही जिल्ह्यात रुग्ण वाढत असल्याने राज्यात पुन्हा लॉकडाऊनच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply