Take a fresh look at your lifestyle.

टेंशन आणखी वाढले की.. पहा आणखी कोणता नवा धोका आणलाय करोना विषाणूने

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असलेल्या जगाला नवनवे धक्के देण्यासाठी हा महाभयंकर विषाणू पुन्हा तयार होत आहे. त्यामुळे जगभरातील संशोधक आणि सरकारी यंत्रणा यांची डोकेदुखी वाढली आहे. कारण जगाची झोप उडवणारा डेल्टा व्हेरिएंट आता थेट डेल्टा + या पद्धतीने सक्रीय होत आहे.

Advertisement

ब्रिटनची आरोग्य संस्था पब्लिक हेल्थ इंग्लंड (PHE) यांनी याबाबत संशोधन केलेले आहे. डेल्टा व्हेरिएंटचे 63 जीनोम नवीन K417N म्यूटेशनसह सक्रीय होत असल्याचे संशोधन पुढे आलेले आहे. डेल्टा व्हेरिएंटमध्ये रुटीन तपासादरम्यान डेल्टा+ ची माहिती पुढे आलेली आहे. भारतात 7 जूनपर्यंत डेल्टा+ व्हेरिएंटचे 6 रुग्ण आढळले आहेत. रुग्णांना सध्या दिली जाणारी मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेल या नवीन व्हेरिएंटवर परिणाम करणार नाही, असा संशय शास्त्रज्ञांना वाटत आहे.

Advertisement

टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत रिपोर्ट प्रसिद्ध केलेला आहे. त्यात म्हटले आहे की, दिल्लीच्या इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटेग्रेटिव बायोलॉजीचे डॉ. विनोद स्केरिया यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलेय की, अँटीबॉडीज कॉकटेलचा काहीच परिणाम होताना दिसत नसल्याने K417N म्यूटेशनबाबात मोठी चिंता वाटते. मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेल कॅसिरिविमॅब (Casirivimab) आणि इम्डेविमॅब (Imdevimab) यांनी तयार केलेले आहे. फार्मा कंपनी सिप्ला आणि रोश (Roche) इंडियाने मिळून तयार केलेल्या या औषधास आपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply