Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून अदानींच्या इन्व्हेस्टर्सला बसलाय झटका; एक तासात 50,000 कोटी रुपयांचे नुकसान

मुंबई : नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (NDSL) यांच्यानुसार अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक असलेल्या तिघांची माहिती उपलब्ध नसल्याने 43,500 कोटी रुपयांची गुंतवणूक फ्रीज करण्यात आलेली आहे. याचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसला आहे. अदानी ग्रुपच्या 6 लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स 5% वरुन 22% पर्यंत घसरले असून फ़क़्त तासाभरात तवणूकदारांचे सुमारे 50,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Advertisement

अल्बुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड हे मॉरीशसची राजधानी पोर्ट लुईसच्या एका पत्त्यावर रजिस्टर्ड असून या पैशांचे मालक कोण आहेत हे स्पष्ट होत नसल्याने सेबीने 43,500 कोटी रुपयांची गुंतवणूक फ्रीज केली आहे. त्या तिघांवर मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचा फटका इन्व्हेस्टर्सला बसलेला आहे. हे गुंतवणूकदार कोण आणि हे मग नेमके पैसे कोणाचे असा मुद्दा यानिमित्ताने उपस्थित झालेला आहे.

Advertisement

यामध्ये अदानी समूहाचा कोणताही मुद्दा नाही परंतु त्यांच्या शेअर्समध्ये ही गुंतवणूक आहे, त्यामुळे या ग्रुपच्या शेअर्समध्ये घट दिसून आली आहे. या पैशांचे मालक कोण, याचा शोध घेतला जाणार आहे. अदानी एंटरप्रायजेसचे शेअर 22% घसरून 1,200 रुपये झाले. ग्रुपच्या इतर कंपन्यांचे शेअर्सही त्याच मार्गाने कोसळले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply