Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक की.. चीनने वाढवलेय आणखीही टेंशन; पहा जगाच्या आरोग्याचा नेमका काय घोळ करून ठेवलाय त्यांनी

वॉशिंग्टन : कोरोना विषाणूच्या उगमाच्या मुद्द्यावर अमेरिकेने चीनची चांगलीच कोंडी केली आहे. कोरोना वायरस वुहान प्रयोगशाळेतुनच लीक झाल्याचा दावा केला जात आहे, काही शास्त्रज्ञांनी तसे पुरावे सुद्धा मिळाले असल्याचे सांगितले आहे. जगभरातील विविध संस्थांचे जे अहवाल येत आहेत, त्यातही हा विषाणू प्रयोगशाळेतूनच पसरल्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे.

Advertisement

मात्र, चीनच्या अभ्यासकांनी आता असा एक दावा केला आहे, की ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. होय, प्रयोगशाळेच्या थिअरीला खोटे ठरवणारा असा दावा या अभ्यासकांनी केला आहे. या अभ्यासकांनी सांगितले, की आम्हाला वातवाघळात नवीन कोरोना विषाणू मिळाले आहेत. यामध्ये कोविड 19 महामारी फैलावणाऱ्या ‘SARS-CoV-2’ सारखा विषाणू सुद्धा आहे. या अभ्यासासाठी मे 2019 पासूनच नमुने घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये वुहान प्रांतात कोरोना वेगाने फैलावण्यास सुरुवात झाली होती.

Advertisement

सीएनएनच्या रिपोर्ट नुसार या अभ्यासकांचे असे म्हणणे आहे, की दक्षिण-पश्चिम चीनमध्ये केलेल्या अध्ययनातून असे लक्षात येते की वटवाघळामध्ये किती कोरोना विषाणू असतात आणि यातील किती विषाणू माणसांमध्ये पसरू शकतात. सेल पत्रिकेत प्रकाशित रिपोर्टमध्ये शाडोंग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितले की वटवाघळांच्या वेगवेगळ्या प्रजातींपासून आतापर्यंत एकूण 24 कोरोना वायरस जीनोम एकत्रित केले आहेत. यातील चार SARS-CoV-2 सारखे आहेत. मे 2019 ते नोव्हेंबर 2020 या दरम्यान जंगलात राहणाऱ्या वटवाघळांचे नमुने घेतले होते. एक वायरस ‘SARS-CoV-2’ शी बऱ्याच अंशी मिळताजुळता आहे.

Advertisement

दरम्यान, हा अहवाल अशा वेळी आला आहे की ज्यावेळी कोरोना विषाणू जगभरात पसरण्यास चीनच जबाबदार असल्याचे जोरदार आरोप होत आहे. आता हा अहवाल आल्याने चीनला फायदा होणार आहे. कारण, चीन सुरुवातीपासूनच जगाला असेच सांगत आला आहे, या अहवालाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. असे असले तरी हा रिसर्च चीनच्याच शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यामुळे अमेरिका किंवा अन्य देश यावर विश्वास ठेवण्याची शक्यता कमीच आहे. चीन तसाही विश्वासघातकीच आहे आणि जगाला याचा अनुभव सुद्धा आहे. त्यामुळे चीनचा हा आणखी एक डाव सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply