Take a fresh look at your lifestyle.

गुगलने आणलेय ‘तेही’ भन्नाट फिचर; पहा नेमके काय होणार फायदे

पुणे : आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात गुगलला कोण ओळखत नाही. अगदी कशाचीही माहिती पाहिजे असेल तर गुगल आहेच की. इतके आज गुगलचे विश्व विस्तारले आहे. कोणताही प्रश्न असो त्याचे उत्तर गुगल तुम्हाला देतेच. नवनवीन फीचर्स आणून माणसांचे आयुष्य सुखकर करण्याच गुगलचेही योगदान आहे. त्यामुळेच आता गुगलने असे एक जबरदस्त फीचर आणले आहे, की त्याचा फायदा मानवी आरोग्यास होणार आहे.

Advertisement

आज ताणतणावाच्या काळात तंदुरुस्त राहणे जास्त महत्वाचे आहे. शरीर फीट राहण्यासाठी पायी चालणे हा एक खूप महत्वाचा व्यायाम आहे. पायी चालताना आपण किती पावले चाललो किंवा किती किलोमीटर किती वेळात गाठले, याचा विचार डोक्यात असतोच. अनेक जण तर याचे मोजमाप देखील करतात. मात्र, प्रत्येकालाच असे करणे शक्य होईल असेही नाही. मात्र, आता काळजी करू नका, गुगलने तुमची ही अडचण दूर केली आहे. तुम्ही रोज किती वेगाने पायी चाललात याची अगदी बिनचूक माहिती गुगल तुम्हाला देणार आहे. कारण, गुगलने ‘पेस्ड वॉकिंग’ हे नवीन फिचर बाजारात आणले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही टाकलेल्या प्रत्येक पावलाबद्दल योग्य आणि सविस्तर माहिती देणार आहे. यामध्ये ऑडिओ बिट्सचा वापर करुन युजरची पावले ट्रॅक करता येतात. ‘गुगल फीट’ आणि ‘अँड्रॉइड’ फोनमध्ये कंपनी हे फीचर उपलब्ध करुन देणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

Advertisement

स्मार्ट वॉच किंवा फोन मधील अॅपच्या मदतीने किती तुम्ही किती पावले चाललात याची माहिती तर मिळतेच. मात्र, या नवीन फीचरमध्ये चालण्याचा वेग मोजता येणार आहे. तसेच एका मिनीटाला शंभर पेक्षा जास्त पावले चाललात तर हार्ट पॉईंट सुद्धा मिळणार आहे. आपण ज्यावेळी चालतो त्यावेळी प्रत्येकाच्या चालण्याचा वेग एक सारखा नसतो. तसेच आपण आपल्या पद्धतीने कमी जास्त सुद्धा करू शकतो. मात्र, या वेगाचे मोजमाप आपण करु शकत नाही. त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम हे ही जाणून घेता येत नाही. आता मात्र पेस्ड वॉकिंग या फीचरमुळे आपल्याला चालण्याचा वेग मोजता येणार आहे. आपण चालत असताना चालण्याचा वेग नेहमीसारखा नाही, वेग वाढला किंवा जास्त झाला आहे, याची माहिती होईल. त्यानुसार चालण्याचा वेग कमी किंवा जास्त करता येऊ शकेल. नैसर्गिक पद्धतीने आपण जसे चालतो त्याप्रमाणेच या फीचरमध्ये माणसाच्या चालण्याचा वेग मोजला जातो. या फीचरचा वापर केल्याने त्याचा आरोग्यास निश्चितच फायदा होणार आहे. त्या दृष्टीनेच कंपनीने हे अनोखे फीचर तयार केले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply