Take a fresh look at your lifestyle.

आणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी दाखवून दिला ‘..स्वतः मात्र कोरडे पाषाण’चा विरोधाभासी प्रकार..!

अहमदनगर / सोलापूर : लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण, ही म्हण सर्वांना माहित आहे. भारतात सध्या असल्याच नेत्यांसह मतदारांची चालती आहे. तसाच प्रकार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गल्ली-दिल्लीच्या नेत्यांकडून भारतीयांना अनुभवास येतात. करोना संकटात दणक्यात सभा घेणारे मोदीजी आणि किरकोळ कारणासाठी गर्दी करून मिरवणारे नेते त्यामुळेच सध्या सोशल मीडियामध्ये रडारवर असतात.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांच्या बाबतीत असाच किस्सा चर्चेत आहे. रोहित पवार यांनी दाढी करताना संदेश दिला. मात्र, त्याचवेळी काही मास्क न बांधलेले कार्यकर्ते त्याच फोटोत दिसल्याने मग त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले आहे. सरकारने सलून सुरू करण्यास परवानगी दिल्याने #KJIDF मार्फत माझ्या मतदारसंघातील सर्व सलून चालकांना त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा किट देण्यात येतंय. आज खर्डा इथंल्या सलूनमधील कारागिरांना सुरक्षा किट दिलं असता, यावेळी अनेक दिवसांनी विठ्ठल थोरात यांच्या सलूनमध्ये ट्रिमिंग केलं. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने आपल्याला अधिक जागरूक रहावं लागेल. या पार्श्वभूमीवर सर्वच सलूनमधील कारागिरांनी स्वतःसह ग्राहकांच्याही आरोग्यासंदर्भात योग्य खबरदारी घ्यावी, असा संदेश दाढी करतानाचा फोटो त्यांनी शेअर केला आहे.

Advertisement

त्यावर अनेकांनी त्यांची कथनी आणि करणी यामध्ये असलेला भेद लक्षात आणून देण्याचे काम केलेले आहे. नवनाथ राक्षे यांनी म्हटले आहे की, सलून मध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यावी ह्याच मार्गदर्शन होईल का? तुमचा विरोध नाही पण तिसरी लाट येणार आहे आणि हे जर सरकारला समजतं तर त्यांनी त्याच्या guideline आणि त्या बरोबर की चूक ह्यावर तुमचा दृष्टीकोन वाचायला नक्की आवडेल. आपले व्यवसायिक बांधव खूप त्रासातून जातायेत तरी मी वरील हे विधान करतोय. तर, आत्माराम फड यांनी म्हटले आहे की, जेव्हा सरकार पडण्याची भीती वाटेल तेव्हा तीसरी लाट आणली जाईल. तसेच खाण तशी माती मावळन तशी भाचा भाची.. रोहित दादा तुमच्या आत्या (मावळण ) सुप्रिया ताई गत तुम्हाला फोटो काढण्याचीं टाकायची सवय लागली…., असे वंदना भोसले यांनी म्हटले आहे.

Advertisement

योगेश राख यांनी एकूण गर्दी लक्षात घेऊन म्हटले आहे की, जर तिसरी लाट येणार आहे तर तुम्ही अशी तुमची दाढी करण्यासाठी इतके लोक का घेऊन फिरताय तुम्ही तर जबाबदार व्यक्ती आहात..! अनंत सलगर यांनी म्हटलेय की, गर्दी केल्यानंतर तिसरी लाट येनार आहे..मग तुम्ही का गर्दी करत आहात ? तुमचे कार्यकर्ते सलून बाहेर का थांबले नाहीत ? या पोस्ट मध्ये लिहिल्याप्रमाणे तसे फोटो दिसत नाहीत… भाऊसाहेब तांबरे यांनी म्हटलेय की, कसं काय जमलं बुवा फोटोग्राफरला? सुरक्षित अंतर ठेवणारी सगळी मंडळी एकाच फोटोत बसवणे? नंबर द्या त्यांचा..!

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply