Take a fresh look at your lifestyle.

म्हणून युपीमध्ये नाही राहणार योगी सरकार, पहा नेमके असे का म्हटलेय मलिक यांनी

मुंबई : उत्तर प्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात बदल होणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळात सुद्धा काही बदल होणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली आहे. केंद्राच्या किंवा उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळात बदल होवो अथवा न होवो उत्तर प्रदेशात यावेळी परिवर्तन होणारे हे जनतेने ठरवले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

Advertisement

ते पुढे म्हणाले, की उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळात काही फेरबदल करायचे असतील तर तो अधिकार मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा आहे. त्यांनी बदल केले किंवा नाही केले तरी यावेळच्या निवडणुकीत नागरिकांना मात्र बदल करण्याचा विचार केला आहे. देशात सध्या मंत्रिमंडळात बदलांच्या चर्चांनी जोर धरला आहे. उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपने येथे आतापासूनच तयारी सुरू केली आहे. फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. दुसरीकडे विरोधकांनी सुद्धा तयारी सुरू केली आहे. यावेळीही निवडणूक जिंकायची या उद्देशाने भाजप नियोजन करत आहे. नाराज असलेल्यांना मंत्रीपदे देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा विचार आहे. त्यासाठीच अखेरच्या टप्प्यात मंत्रिमंडळात काही बदल होणार असल्याची चर्चा आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजप अध्यक्षांची भेट घेतली होती. याच काळात केंद्रीय मंत्रिमंडळातही काही महत्वाचे बदल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय चर्चा जोरात सुरू आहेत. विरोधी पक्षांचे नेते प्रतिक्रिया देत आहेत.

Advertisement

दरम्यान, उत्तर प्रदेशात पुढील वर्षात निवडणुका असल्याने भाजपने तयारीस सुरुवात केली आहे. पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांच्या बैठका होत आहे. संघाचे पदाधिकारी सुद्धा दौरे करत आहेत. त्यामुळे या राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. यावेळी भाजप योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यादृष्टीनेच या राज्यात नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे काँग्रेसची स्थिती मात्र आधिकच खराब होत आहे. काँग्रेस नेते जितीन प्रसाद यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply