Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘त्या’ मुद्द्यावर झोडपलेय भाजपने; पहा नेमके काय म्हटलेय ठाकरे सरकारला

मुंबई : राज्यातील अनेक भागात सध्या जोरदार पाऊस होत आहे, राजधानी मुंबईत मात्र पावसाने दाणादाण उडवली आहे. रस्त्यात पाणी साचले आहे, लोकांच्या घरात पाणी आले आहे, त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसावरून राजकारण सुद्धा जोरात सुरू आहे. विरोधी भाजप राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करत आहे. इतकेच नाही तर मुंबईतील नालेसफाईच्या कामात एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला होता. त्यानंतर आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे.

Advertisement

उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की ‘नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे पण मुंबईच्या विकासात भरीव योगदान केले, गडकरींनी मुंबईत 56 पूल बांधले. फडणवीसानी मेट्रोचे जाळे विणले. याउलट मुंबई आमची असा उठता बसता ध्यास करणाऱ्यांनी काय दिले ? दरवर्षी पावसात तुंबणारी मुंबई, खड्डे, अनधिकृत बांधकाम व ते पडल्याने जाणारे जीव.’ अशी टीका त्यांनी केली आहे.

Advertisement

दरम्यान, दोन दिवसांपासून मुंबईत पाऊस सुरू आहे. काल दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता, संध्याकाळनंतर मात्र जोरदार पावसास सुरुवात झाली. आज सुद्धा शहरात पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सध्या बंद आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात आणखी काही दिवस मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मात्र, पहिल्याच पावसात शहरात अशी स्थिती निर्माण झाली असताना पावसाळ्याच्या चार महिन्यात काय होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. नियोजनाचा अभाव दिसत आहे. त्यामुळे विरोधक राज्य सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत.

Advertisement

तसेही मुंबईसाठी ही समस्या नवी नाही. पाऊस पडला की येथे रस्त्यांवर पाणी साचते. या काळात रेल्वे वाहतूक बंद पडण्याचा अनुभवही मुंबईकरांना नवीन नाही. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होत नाहीत असे नाही प्रयत्न होतात, मात्र तरीही समस्या कायम आहे. याचा त्रास मात्र सामान्य नागरिकांना कायमच सहन करावा लागत आहे. राजकीय पक्षांच्या राजकारणात हा मुद्दा नेहमीच मागे राहत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply