Take a fresh look at your lifestyle.

तिथे होतोय औषधे आणि इंजेक्शनचा काळाबाजार बिनदिक्कत; पहा नेमका काय झालाय आरोप

लखनऊ : उत्तरप्रदेश राज्यात पुढील वर्षात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, आतापासूनच राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. कोरोना संकटात सत्ताधारी भाजपच्या कारभारावर विरोधी पक्ष सडकून टीका करत आहेत. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी योगी सरकावर टीका केली आहे.

Advertisement

कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. खासगी दवाखान्यांनी तर मनमानी कारभार करत लूट सुरू केली आहे. या दवाखान्यांच्या मनमानी कारभारावर कुणाचेच नियंत्रण नाही. औषधे आणि इंजेक्शनचा काळाबाजार बिनदिक्कत सुरू आहे. कोरोना कर्फ्यू आणि ऑक्सिजनच्या कमतरतेने नागरिक हैराण झाले आहेत, असे गंभीर आरोप अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर केले आहेत. राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना यादव म्हणाले, की एकीकडे सरकार सांगत आहे, की कोरोनावरील उपचार मोफत आहेत तर दुसरीकडे मात्र सरकारी बँक कोरोना उपचारांसाठी ८.५ टक्के व्याज दराने कर्ज देत आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणेचे असे हाल झाले आहेत, की रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना अक्षरशः पायपीट करावी लागते. भाजपच्या राज्यात गंभीर रुग्णांना अॅम्ब्यूलन्स सुद्धा मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे.

Advertisement

समाजवादी सरकारच्या काळात १०८ अॅम्ब्यूलन्स सेवा सुरू करण्यात आली होती. आज मात्र, ही योजना कुठेच दिसत नाही. सरकारने उपचार आणि आवश्यक औषधांसाठी जे दर निश्चित केले होते त्यानुसार नियमांचे पालन मात्र झाले नाही. राज्यातील जनतेच्या समस्या काय आहेत, हे समजून घेण्याऐवजी फक्त सत्ता कशी टिकवता येईल याचाच विचार भाजप करत असल्याचे यादव यांनी सांगितले. दरम्यान, आता उत्तर प्रदेशातही कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. राज्यात रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेस काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तरी देखील काही ठिकाणी रुग्ण सापडत  आहेत, त्यामुळे धोका पूर्णपणे टळलेला नाही. या मुद्द्यावर विरोधक योगी सरकारवर टीका करत आहेत. कोरोना आटोक्यात येत असला तरी रुग्ण सापडत आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणा आणि रुग्णांना होत असलेला त्रास यावरही राज्य सरकावर निशाणा साधण्यात येत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply