Take a fresh look at your lifestyle.

काश्मीरच्या मुद्द्यावर पेटलेय राजकारण; पहा नेमका कोणी, कोणत्या मुद्द्यावर केलाय काय आरोप..!

दिल्ली : काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानात रोजच राजकारण होत असले तरी भारतीय राजकारणात मात्र अनेक दिवसांपासून हा मुद्दा चर्चेतच नव्हता. मात्र, या मुद्द्यावर भारतातही जोरदार राजकारण सुरू झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे गदारोळ उडाला आहे. भाजपने हा मुद्दा हातोहात उचलल काँग्रेसवर जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या नेत्यांनी संधी ओळखत काँग्रेसवर आरोपांचा भडीमार केला आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत दिग्विजय सिंह यांच्यावर जोरदार टीका केली.

Advertisement

पात्रा म्हणाले, की पुलवामा घटनेस दिग्विजय सिंह यांनी फक्त एक दुर्घटना असे म्हटले होते. यांनीच २६/११ दहशतवादी हमल्यात पाकिस्तानला क्लिन चीट देण्याचा प्रयत्न केला होता. आज देशातील न्यूज चॅनेलवर फक्त क्लब हाऊस या मुद्द्यावरच चर्चा सुरू आहे. दिग्विजय सिंह कशा प्रकारे देशाच्या विरोधात वक्तव्ये देत आहेत, आणि पाकिस्तानला फायद्याचे ठरेल असे बोलत आहेत, हे आता सगळ्यांनीच पाहिले आहे. यावरुन हेच स्पष्ट होत आहे, की पाकिस्तान आणि काँग्रेसचे विचार एकसारखेच आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. भाजपचे नेते मंत्री, नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणी दिग्विजय सिंह यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Advertisement
Advertisement

दरम्यान, क्लब हाऊस येथील चॅटचा एक ऑडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस पक्ष जर पुन्हा सत्तेत आला तर जम्मू-काश्मीर मध्ये पुन्हा कलम ३७० आणण्यावर विचार केला जाईल, असे सांगितल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी हा ऑडिओ जारी केला आहे. या प्रकरणी राजकारणात वादळ उठले आहे. भाजप नेते पत्रकार परिषदा घेऊन काँग्रेसवर आरोप करत आहेत. कोरोना काळातील अपयश, कोलमडलेली अर्थव्यवस्था या मुद्द्यांवर अडचणीत सापडलेल्या भाजपला या मुद्द्याने संधी मिळाली आहे. त्यामुळेच भाजपचे नेते काँग्रेसवर आरोप करत आहेत. या प्रकरणावर आता काँग्रेस काय प्रतिक्रिया देणारे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.