Take a fresh look at your lifestyle.

प्रसिद्ध झालेला ‘तो’ अहवाल खोटाच? पहा नेमका काय दावा केलाय मोदी सरकारने

दिल्ली : देशात कोरोना मुळे होणाऱ्या मृत्यूंच्या आकडेवारीवरुन जोरदार राजकारण सुरू आहे. या मुद्द्यावर राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात वाद होत आहेत. मृत्यूंच्या आकड्यात गडबड झाल्याचे बिहार सरकारने मान्य सुद्धा केले आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय संस्था, साप्ताहिकांच्या अहवालात कोरोनामुळे भारतात कितीतरी आधिक मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. आताही जागतिक पातळीवर नावाजलेल्या साप्ताहिकात प्रकाशित एका लेखात, भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची जी अधिकृत माहिती दिली जात आहे, त्यापेक्षा पाच ते सात पट आधिक रुग्णांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे, असा दावा करण्यात आला आहे.

Advertisement

या दाव्यामुळे खळबळ उडाली असून यावर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. साप्ताहिकाने असा अंदाज व्यक्त करण्याआधी ज्या काही अहवालांचा अभ्यास केला आहे, त्या अहवालांद्वारे एखाद्या देशातील मृत्यूदर निश्चित केला जाऊ शकत नाही. हा लेख काल्पनिक आहे, यास काहीही ठोस आधार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ‘आयसीएमआर’ ने दिलेल्या नियमांनुसार कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची नोंद घ्यावी, अशा सूचना राज्यांना दिलेल्या आहेत. जिल्हावार कोरोनाची प्रकरणे आणि या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंची योग्य माहिती व्हावी यासाठी राज्यांनी प्रभावी नियोजन करणे गरजेचे आहे, असे मंत्रालयाने स्पष्ट केले. बिहारमध्ये कोरोना मृत्यूंच्या आकडेवारीत गडबड झाल्याचे समोर आल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने असे वक्तव्य केले आहे.

Advertisement

बिहारमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात अचानक मोठी वाढ झाल्याचे दिसून आले होते. राज्याच्या आरोग्य विभागाने ९४२९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे देशातील मृत्यूंचा आकडा अचानक वाढला. कोरोना आटोक्यात येत असताना मृत्यूंचा आकडा अचानक कसा वाढला, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. या प्रकाराची तत्काळ दखल घेत केंद्राने बिहार राज्य सरकारला एक पत्र पाठवले आहे. राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची सविस्तर आणि जिल्हावार माहिती देण्यास सांगितले आहे.

Advertisement

दरम्यान, कोरोना मृत्यूंमुळे देशभरातच नवा वाद सुरू झाला आहे. सराकारी यंत्रणांकडून दिली जाणारी माहिती आणि प्रत्यक्षातील माहिती यात तफावत असल्याचे आरोप होत आहेत. या आरोपात तथ्य असल्याचेही दिसले आहे. बऱ्याच वेळेस ऑनलाइन पोर्टलवर माहिती लवकर अपडेट होत नाही, खासगी दवाखान्यांतील माहिती मिळण्यास उशीर होतो, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणी आता संभ्रम आधिकच वाढत चालला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply