Take a fresh look at your lifestyle.

म्हणून करोनाचे डेथ ऑडिट आहे खूप महत्वाचे; पहा नेमके काय म्हटलेय डॉ. गुलेरिया यांनी

दिल्ली : देशभरात सध्या कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या मुद्द्यावर वादळ उठले आहे. सरकारी यंत्रणांकडून दिली जाणारी माहिती आणि प्रत्यक्षातील माहिती यामध्ये तफावत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. कोरोना मृत्यूच्या आकडेवारीत गडबड झाल्याचे खुद्द बिहार सरकारनेच मान्य केले आहे. त्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने सुद्धा महाराष्ट्र आणि बिहार राज्यांना पत्र पाठवून कोरोना मृत्यूंबाबत सविस्तर माहिती मागितली आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवालात सुद्धा भारतात कोरोनामुळे खूप जास्त मृत्यू झाले आहेत, असे म्हटले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर देशभरात नवा वाद सुरू झाला आहे.

Advertisement
Advertisement

एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी या मुद्द्यावर मत व्यक्त करत रुग्णालये आणि राज्यांना काही उपाय सांगितले आहेत. ते म्हणाले, की पारदर्शकता आणण्यासाठी रुग्णालयांनी आणि राज्यांनी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचे ऑडिट केले पाहिजे. या प्रकारांमुळे कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी रणनिती तयार करण्याच्या प्रयत्नात अडचणी निर्माण होतील. त्यामुळे अशा परिस्थितीत पारदर्शकता आणणे महत्वाचे आहे आणि यासाठी कोरोनामूळे झालेल्या मृत्यूचे ऑडिट झाले पाहिजे. रुग्णालये आणि राज्यांना या पद्धतीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. कारण, मृत्यूदराचे कारण काय आणि हा दर कमी करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, हे जाणून घेतले पाहिजे. जोपर्यंत आपल्याकडे स्पष्ट आकडेवारी नसेल तोपर्यंत आपण मृत्युदर कमी करण्यासाठी नियोजन करू शकणार नाही असे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, या मुद्यावर देशात सध्या गदारोळ सुरू आहे. विरोधक केंद्र आणि राज्य सरकारवर आरोप करत आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे खरे आकडे दिले जात नसल्याचा आरोप केला जात आहे. राज्यांकडून माहिती घेतांना काही गडबड होत आहे त्यामुळे योग्य माहिती उपलब्ध होत नाही. बऱ्याच वेळा ऑनलाइन पोर्टलवर माहिती अपडेट करण्यास उशीर होतो. सरकारी दवाखाने माहिती लवकर अपडेट करतात त्यातुलनेत खासगी दवाखान्यांकडून माहिती मिळण्यास उशीर होते. त्यामुळे पोर्टलवर माहिती अपडेट करण्यास उशीर होते. या काही कारणांमुळे राज्य सरकार आणि पुढे केंद्र सरकार यांनी कोरोनाबाबत माहिती मिळण्यास उशीर होतो. केंद्र सरकारने या संदर्भात काही सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यांच्या आरोग्य विभागांनी कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.