Take a fresh look at your lifestyle.

पटोलेंच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर भाजपने हाणलाय टोला; पहा काय म्हटलेय त्यांनी

पुणे : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याने महाविकास आघाडी सरकारमध्येही घालमेल चालू आहे. कारण, फ़क़्त पक्ष न वाढवता थेट स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी पटोले यांनी केली आहे. परिणामी भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. मात्र, आता पटोले यांनी थेट मुख्यमंत्री या पदावर बसण्याची इच्छा व्यक्त केल्याने ते चर्चेत आलेले आहेत.

Advertisement

पारस फाटा येथील हॉटेलचालक मुरलीधर राऊत यांच्या कामाचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात केले होते. मात्र, आता त्याच राऊत यांनी पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात अकोले येथे बोलताना पटोले यांनी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचे म्हटले होते. कार्यकर्त्यांनीही त्यांच्या या इच्छेनुसार कंबर कसण्याची तयारी दाखवली होती. आता तोच व्हिडिओ पाहून भाजपला नाना पटोले यांची खेचण्याची इच्छा झालेली आहे.

Advertisement

मुंबई भाजपने म्हटले आहे की, महाराष्ट्रात तोंडी लावायला राहिलेल्या काँग्रेस पक्षातले नेते पटोले यांना मुख्यमंत्री व्हायचे धुमारे फुटलेत. जनता पुसत नाही, सत्तेतले मित्रपक्ष विचारत नाहीत, दिल्लीतलं नेतृत्व किंमत देत नाही आणि ह्यांच्या स्वप्नांचे फुगे आकाशात उडताहेत. आता महाराष्ट्र काँग्रेस किंवा पटोले यावर कोणती प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

BJP MUMBAI on Twitter: “महाराष्ट्रात तोंडी लावायला राहिलेल्या काँग्रेस पक्षातले नेते @NANA_PATOLE यांना मुख्यमंत्री व्हायचे धुमारे फुटलेत. जनता पुसत नाही, सत्तेतले मित्रपक्ष विचारत नाहीत, दिल्लीतलं नेतृत्व किंमत देत नाही आणि ह्यांच्या स्वप्नांचे फुगे आकाशात उडताहेत. @OfficeofUT #mahavasooliaaghadi https://t.co/jgB7DPweij” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply