Take a fresh look at your lifestyle.

दणकाच की.. ‘त्या’ कंपनीने फ़क़्त तीनच दिवसात विकले २३० कोटी रुपयांचे फोन

दिल्ली : जगात आघाडीवरील स्मार्टफोन कंपनी असणाऱ्या ओप्पो या कंपनीने काही दिवसांपूर्वी भारतात लेटेस्ट ओप्पो एफ १९ प्रो प्लस ५ जी स्मार्ट फोन लाँच केला होता. या फोनला भारतात जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. एफ १९ प्रो सिरीज बाजारात दाखल झाल्यानंतर फक्त तीनच दिवसात तब्बल २३० कोटी रुपयांचे फोन विकले गेले आहेत. भारतातील मुंबई, बंगळुरू आणि अहमदाबाद या शहरात या फोनची सर्वाधिक विक्री झाली आहे. ओप्पो कंपनीने केलेल्या संशोधनातूनच ही माहिती समोर आली आहे. या फोनमध्ये अनेक वैशिष्ट्ये दिली आहेत. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत या फोनची जबरदस्त क्रेझ पहायला मिळत आहे.

Advertisement

या 5 जी स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या फोनची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. या व्यतिरिक्त कंपनीने आणखीही आकर्षक फीचर्स दिले आहेत. त्यामुळे भारतीय ग्राहक या फोनची जोरात खरेदी करत आहे. विशेष म्हणजे, कोरोना काळात सुद्धा मोबाइलला मागणी वाढत असल्याचे दिसून आले आहे. तसेही, नवा फोन बाजारात आला की खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मार्केटिंग आणि जाहिरातींच्या माध्यमातूनही प्रचार केला जातो.

Advertisement

स्मार्टफोनसाठी भारत हा एक मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे मोबाइल कंपन्यांचे या बाजारपेठेवर कायमच लक्ष असते. भारतात दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे स्मार्टफोन विकले जातात. यामध्ये सॅमसंग, ओप्पो, व्हीवो, अॅपल या कंपन्यांच्या मोबाइलना जास्त मागणी असते. देशात ओप्पो, वीवो, रेडमी, सॅमसंग या कंपन्यांच्या मोबाइलना जास्त मागणी आहे. सॅमसंगच्या तुलनेत ओप्पो, वीवो या कंपन्यांचे फोन स्वस्त आहेत. आणि या फोनमध्ये फीचर्स सुद्धा जास्त आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात भारतात या स्मार्टफोन्सना मागणी वाढली आहे. याआधीही ज्यावेळी कंपनीने ‘ओप्पो एफ १९ प्रो प्लस’ आणि ‘ओप्पो एफ १९ प्रो’ हे दोन स्मार्टफोन बाजारात आणले होते, त्यावेळीही या फोनला तुफान प्रतिसाद मिळाला होता. तीन दिवसांमध्येच कंपनीने भारतात एफ १९ सीरिजच्या तब्बल २३०० कोटी रुपयांच्या फोन्सची विक्री केली होती. सेलच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये झालेल्या विक्रीने यापूर्वीच्या सर्व ओप्पो फोनच्या विक्रीचा विक्रम मोडल्याचंही कंपनीने त्यावेळी सांगितले होते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply