Take a fresh look at your lifestyle.

म्हणून देशभरात होणार आहे ‘ते’ सर्वेक्षण; पहा नेमके काय नियोजन केलेय केंद्र सरकारने

दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी होत आहे. मात्र या आजाराचा धोका अजूनही कायम आहे. कारण, नवीन रुग्ण आढळून येत आहेत, मृत्युदर सुद्धा वाढला आहे. आता तर तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. देशात अशी परिस्थिती असताना कोरोना किती प्रमाणात फैलावला याचा योग्य अंदाज मिळवण्यासाठी आयसीएमआर देशभरात सीरो सर्वे करणार आहे. या सर्वेचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. या महिन्यातच सर्वे सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती निती आयोगाचे सदस्य डॉ. वी. के. पॉल यांनी दिली.

Advertisement

याआधी उत्तर प्रदेश राज्यात असा सर्वे करण्यात आला होता. त्यानंतर आता देशात सर्वे करण्यात येणार आहे. या सर्वेमध्ये कोरोना हॉटस्पॉट भागातील एकच रक्तगट असणाऱ्या लोकांची तपासणी करण्यात येते. आरोग्य पथकांकडून लोकांच्या घरी जाऊन त्यांची परवानगी घेण्यात येते. हा सर्वे भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे (एनसीडीसी) अधिकारी आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने केला जातो. देशभरात हा सर्वे होणार असल्याने यासाठी राज्यांची सुद्धा मदत घ्यावी लागणार आहे.

Advertisement

दरम्यान, देशात आता सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. आता तर नवीन लसीकरण धोरणात केंद्र सरकारने आधिकच कठोर पवित्रा घेतला आहे. राज्यांना मोफत लसी दिल्या जाणार आहेत. मात्र, जी राज्ये लसी वाया घालवतील त्यांचे निगेटीव्ह मार्किंग केले जाणार आहे. म्हणजेच, त्यांना पुढील वेळी लसी कमी मिळणार आहेत. त्यामुळे या राज्यांना आता आधिक काटेकोरपणे नियोजन करावे लागणार आहे. कोणत्याही परिस्थितीत लसी वाया जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. केंद्राने तशा गाइडलाइन्सही राज्यांना पाठवल्या आहेत. यामध्ये लसीकरणाबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत. यानुसार राज्यांना लसीकरणाचे नियोजन करावे लागणार आहे. येत्या २१ जून पासून देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या मोफत लसीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे.

Advertisement

सीरो सर्वेचे काम सुरू झाले तर राज्यांना मदत करावी लागणार आहे. त्यामुळे राज्यांवर कामकाजाचा ताण आणखी वाढणार आहे. तसाही कोरोनाच्या काळात संपूर्ण आरोग्य विभागावरच ताण वाढला आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने काहीसा दिलासा मिळाला तरी भविष्यातील धोका पाहता त्यानुसार आरोग्य विभागाचे नियोजन सुरू आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply