Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. म्हणून मोदींच्या सरकारचे ठाकरे सरकारला पत्र; पहा करोनाबाबत काय दिल्यात नेमक्या सूचना

मुंबई : कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या वादाने आता वेगळेच वळण घेतले आहे. यामध्ये आता केंद्र सरकारनेच हस्तक्षेप केला आहे. महाराष्ट्र आणि बिहार राज्यांना पत्र पाठवून कोरोना मृतांची नेमकी संख्या किती आहे, याची योग्य माहिती संकलित करण्याचे आदेश या पत्राद्वारे दिले आहेत. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूचा दिनांक याची माहिती जिल्हावार गोळा करण्याच्या सूचना केंद्र सरकारने या पत्रात दिल्या आहेत.

Advertisement

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची खरी आकडेवारी दिली जात नसल्याच्या आरोपांनंतर बिहार सरकारने राज्यात सर्वे केला होता. कोरोना मृत्यूंच्या जिल्ह्यांकडून मिळणाऱ्या माहितीत गडबड झाल्याचे या सर्वेत दिसून आले. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने सुद्धा हे मान्य केले. त्यामुळे राज्यातील मृत्यूंचा आकडा वाढला. महाराष्ट्राने सुद्धा गेल्या १५ दिवसात ७ हजार ५३५ मृत्यू झाल्याचे सांगितले होते. याआधी मात्र कमी संख्या सांगितली होती. त्यामुळे या दोन्ही राज्यांनी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची सुधारीत माहिती द्यावी, असे केंद्राने म्हटले आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी देशभरात कोरोनामुळे सर्वाधिक ६१४८ जणांचे मृत्यू झाल्याचे सांगितले होते. कोरोना नियंत्रणात येत असताना एकाच दिवसात इतके मृत्यू कसे झाले, याचेच सर्वांना आश्चर्य वाटत होते. मात्र, यामध्येही एकट्या बिहारमधील ३९५१ मृत्यंचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे केंद्राने आता बिहार आणि अन्य राज्यांना दररोजचे आकडे मागितले आहेत. या व्यतिरिक्त केंद्र सरकारने उत्तर प्रदेश राज्यास नदीतून काढण्यात आलेल्या मृतदेहांपैकी किती जणांचे मृत्यू कोरोनामुळे झाले होते आणि किती जणांचा मृत्यू झालेला नव्हता, याची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement

दरम्यान, केंद्र सरकारने पत्र पाठवले म्हटल्यानंतर राज्यांना माहिती द्यावी लागणार आहे. तसेही या मुद्द्यावर आता संभ्रम निर्माण होत आहे. कारण, सरकारकडून दिले जाणारे आकडे आणि प्रत्यक्षात तफावत दिसत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. या आरोपात तथ्य असल्याचे बिहार सरकारने केलेल्या सर्वेतूनही स्पष्ट झाले आहे. मृत्यंच्या या वाढत जाणाऱ्या संख्येवरुन केंद्र सरकारवरही टीका होत आहे. त्यामुळे आता खरी परिस्थिती जाणून घेण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने या राज्यांना पत्र पाठवले आहे. या राज्यांप्रमाणेच अन्य राज्यांतही असेच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र, त्या राज्यांना केंद्राने असे काही पत्र पाठवलेले नाही.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply