Take a fresh look at your lifestyle.

IMP : लसदुष्परिणाम दिसल्यास अशी करा तातडीने नोंदणी; देशहितासाठी आहे महत्वाचे

नाशिक : आपल्याकडे कोणत्याही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग अजिबात उरणार नाही याचीच काळजी सरकारी यंत्रणा आणि राजकीय पुढारी घेतात. सगळ्याच सेक्टरमध्ये लागलेली ही अनास्थेची लागण आता करोनाच्या काळात कोविड-१९  लसीकरण मोहिमेतही आणखी फोफावली आहे. कारण, लसीकरणानंतरच्या दुष्परिणांची नोंद घेण्याची प्रक्रिया अजूनही तितकी पारदर्शक केलेली नाही.

Advertisement

लसीकरणानंतर काही त्रास झाल्यास त्याची ऑनलाइन नोंद करता येते. मात्र, त्याबाबत ना केंद्र सरकारने जाहिरात केलेली आहे, ना स्थानिक यंत्रणेने त्याबाबत माहिती दिलेली आहे. त्यामुळे लसीकरणानंतर देशभरात दुष्परिणामांच्या नोंदींचे प्रमाण १० लाख डोसमध्ये केवळ ०.६१ इतके असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलेले आहे. मेरिकेत दर १० लाख डोसमागे साइड इफेक्ट्स नोंदविणाऱ्यांचे प्रमाण ४ केसेस, तर जर्मनीसारख्या देशात १० केसेसच्या नोंदी केल्या जात आहेत.

Advertisement

शास्त्रशुद्ध संशोधन व पारदर्शक व्यवस्था यापेक्षा लसींबाबतही “स्वदेशी’ वगैरे अभिनिवेश कुरवाळण्याकडे व लपवाछपवी करण्याकडे सरकारचा कल दिसत असल्याने आपल्याकडे अजूनही याबाबत वास्तव स्वीकारले जात नसल्याचे जनआरोग्य अभियानचे डॉ. अनंत फडके यांनी म्हटले आहे. जगातील १९ देशांनी लसीमुळे मृत्यू झाल्याचे सिद्ध झालेल्या नागरिकांच्या वारसांना भरपाई जाहीर केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement
नोंदणी पद्धत व मुद्दे असे :
‘को विन’ या केंद्राच्या पोर्टलवर “FAQ’ सत्रात “F’ पर्यायात “रिपोर्टिंग साइड इफेक्ट्स’ हा पर्याय दिसतो
लसीनंतरचे साइड इफेक्ट्स नोंदवण्याच्या या धाग्यात नोंद करणाऱ्यांसाठी इथे तीन पर्याय आहेत
दोन हेल्पलाइन क्रमांक व एक मेल आयडी इथे देण्यात आलेला आहे
CoWIN / www.cowin.gov.in/faq
Helpline Number: +91-11-23978046 (Toll free- 1075)
Technical Helpline Number: 0120-4473222
Helpline Email Id: support@cowin.gov.in

 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply