Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ लोकांमुळे भारतात आली दुसरी लाट आणि झाले मोठेच नुकसान; पहा नेमके काय म्हटलेय मोदींच्या आरोग्यमंत्र्यांनी

दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी होत आहे. रुग्णसंख्या वेगाने कमी होत असल्याने अनेक राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंधात सवलती देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. राज्ये अनलॉक करत असली तरी कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही, आता तर तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

या मुद्द्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी इशारा दिला आहे. ते म्हणाले, की कोरोनाच्या प्रकरणे सध्या कमी होत आहेत म्हणून लोकांमध्ये निष्काळजीपणा आजिबात येता कामा नये. अनलॉक नंतर तर आपणास जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे. मास्क न वापरणे, मास्क योग्य पद्धतीने न वापरणे, आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक नियमांचे पालन न केल्यामुळेच देशात दुसरी लाट आली. आता पुन्हा असे होऊ द्यायचे नसेल तर लोकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

Advertisement

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जो हाहाकार उडाला होता तो सगळ्यांनीच पाहिला. पहिल्या लाटेतून सावरल्यानंतर कोरोना आता पुन्हा येणार नाही, असा समज करुन घेत आपण आधिकच गाफील राहिलो. मास्क वापरले नाहीत, विनाकारण गर्दी केली, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले नाही. तर दुसरीकडे राज्य आणि केंद्र सरकार या दोघांनाही असेच धोरण ठेवले. याच काळात पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुद्धा झाल्या. या सगळ्यांचा परिणाम म्हणून देशास कोरोनाच्या अतिशय घातक अशा दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला. या लाटेने देशाचे मोठे नुकसान केले. या लाटेचा वेग इतका जबरदस्त होता की एकाच दिवसात चार लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडत होते. मृत्यूदरही वाढला होता. अनेक रुग्णांना तर ऑक्सिजनअभावी प्राण गमवावे लागले. इतके नुकसान केल्यानंतर आता ही लाट आटोक्यात येत आहे.

Advertisement

त्यामुळे राज्यांनी पुन्हा निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली आहे. दैनंदीन व्यवहार सुरू होत आहेत. असे असले तरी कोरोनाचा धोका सुद्धा कायम आहे. कारण, कोरोना अजून गेलेला नाही. त्यामुळे या काळात नागरिकांना जास्त जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे. कोरोना रोखण्यासाठी वारंवार लॉकडाऊन करणे देशास परवडणारे नाही. लॉकडाऊनमुळे किती नुकसान होते हे सुद्धा आता लोकांना माहित झाले आहे. त्यामुळे आता लसीकरण आण  कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणेच आवश्यक आहे. आरोग्यमंत्र्यांनीही नागरिकांना असेच आवाहन केले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply