Take a fresh look at your lifestyle.

अशा पद्धतीने खासगी दवाखान्यांना मिळणार आहेत लस; पहा काय बदल झालाय धोरणामध्ये

दिल्ली : देशातील लसीकरणासाठी आता राज्यांना फक्त केंद्र सरकारच लसींचा पुरवठा करणार आहे. लसीकरण धोरणात पुन्हा बदल करत खासगी दवाखान्यांसाठी लस पुरवठा कसा करायचा याचे नियोजन केले आहे. या नव्या धोरणानुसार केंद्र सरकार खासगी दवाखान्यांना उपलब्ध जागा आणि मागणीच्या आधारावर लस पुरवठा करणार आहे.

Advertisement

याबाबत केंद्राच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की खासगी दवाखान्यांना त्यांच्या आसपास असणारी लोकसंख्येचा विचार करुन त्या प्रमाणात लसी देण्याचे नियोजन आहे. केंद्र खासगी दवाखान्यांना २५ टक्के लस देणार आहे. खासगी दवाखान्यांना वाटले तर ते थेट लस कंपन्यांकडून देखील लस खरेदी करू शकतात. केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन गाइडलाइन्स मध्ये असेही म्हटले आहे, की राज्यांनी लहान व मोठ्या खासगी दवाखान्यांना लस देताना या दवाखान्यांच्या आसपासच्या भागात किती लोकसंख्या आहे, याचा विचार करुन त्यानुसार लस पुरवठा करावा. केंद्राने स्पष्ट सांगितले आहे, की खासगी दवाखान्यांच्या एकूण लसींच्या मागणीच्या आधारावरच त्यांना लस देणार आहे. तसेच राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरणाच्या इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लसींचे पैसे भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Advertisement

केंद्र सरकारने खासगी दवाखान्यांसाठी अशा पद्धतीने लस पुरवठ्याचे नियोजन केले आहे. या नियोजनावरुन स्पष्ट होत आहे, की आता खासगी दवाखान्यांना कोटा पद्धतीने लसी मिळणार नाहीत. त्यामुळे या दवाखान्यांच्या मनमानील चाप बसणार आहे. खासगी दवाखान्यांनी कितीही लसींची मागणी राज्य सरकाकडे नोंदवली तरी लसींचा पुरवठा करताना राज्य सरकार लोकसंख्येचा विचार करणार आहे. या लोकसंख्येच्या प्रमाणातच खासगी दवाखान्यांना सरकारकडून लसी मिळतील.

Advertisement

खासगी दवाखान्यांना या लसी सरकारकडून खरेदी कराव्या लागणार आहेत. सरकारने खासगी दवाखान्यांसाठी लसींच्या किमती निश्चित केल्या आहेत. त्यामुळे खासगी दवाखान्यांना त्यांच्या मर्जीने पैसे घेताच येणार नाहीत. सरकारने कोविशील्डसाठी ७८० रुपये, कोवैक्सीन १४१० रुपये आणि स्पुतनिक वी या लसीसाठी ११४५ रुपये असे दर ठरवले आहेत. या दरानेच खासगी दवाखाने लसीकरणासाठी येणाऱ्या लोकांकडून पैसे घेतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, देशातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण येत्या २१ जून पासून सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेची तयारी केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत लसींची कमतरता होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.