Take a fresh look at your lifestyle.

म्हणून MPSC बाबत रोहित पवारांनी म्हटलेय असे; पहा नेमके काय म्हणणे आहे त्यांचे

पुणे : रखडलेल्या पदभरती प्रक्रियेकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्याने महाराष्ट्रातील शिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये मोठा असंतोष आहे. अनेकजण दररोज राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांच्या ट्विटर खात्यावर जाऊन आपली खदखद व्यक्त करतात. त्या पार्श्वभूमीवर आता रोहित पवारांनी या मुद्द्याकडे लक्ष दिलेले आहे.

Advertisement

त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, राज्यातील असंख्य युवा पोलीस भरतीची वाट बघत आहेत. कोरोनामुळं ही भरती रखडली होती, मात्र सध्या लोकांच्या सहकार्याने आणि सरकारच्या प्रयत्नांमुळं कोरोनाची लाट ओसरत असल्याने प्रलंबित पोलीस भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची गरज आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांनी या पोस्टमध्ये टॅग केले आहे.

Advertisement

त्यांनी पुढे म्हटले आहे की, तसंच वनसेवा, AMVI, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि अभियांत्रिकी सेवा परीक्षा या परीक्षांचे रखडलेले निकाल त्वरित लावून पुढील प्रक्रिया सुरू करावी, नियोजित परीक्षांच्या तारखा लवकर निश्चित कराव्यात आणि ज्या विभागांमध्ये रिक्त जागा आहेत अशा विभागांनी याबाबतचा तपशील #MPSC ला सादर करावा. जेणेकरून आयोगाला पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी मदत होईल. याशिवाय ज्या पदांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत, त्याही तातडीने देण्यात याव्यात, यामुळं लोकांची कामं करताना प्रशासनावरही ताण येणार नाही. याकडं राज्य सरकारने प्राधान्याने लक्ष द्यावं, ही विनंती!

Advertisement

(2) Rohit Pawar on Twitter: “राज्यातील असंख्य युवा पोलीस भरतीची वाट बघत आहेत. कोरोनामुळं ही भरती रखडली होती, मात्र सध्या लोकांच्या सहकार्याने आणि सरकारच्या प्रयत्नांमुळं कोरोनाची लाट ओसरत असल्याने प्रलंबित पोलीस भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची गरज आहे. @Dwalsepatil @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks https://t.co/cm2etqOpjf” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply