Take a fresh look at your lifestyle.

‘त्ये’ काही गाढव नाहीत; पहा पाकिस्तानमध्ये का फोफावतोय गाढवांचा व्यापार, वाचा महत्वाचे कारण काय ते

मुंबई : कोरोना महामारीने आधीच संकटात फसलेल्या पाकिस्तानला जबरदस्त तडाखा दिला आहे. कोरोनाने देशाच्या अर्थव्यवस्थेची पुरती वाताहत केली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी पाकिस्तान दुसऱ्या देशांकडून कर्ज घेत आहे. तर, दुसरीकडे गाढवे सुद्धा मदतीला येत आहेत. होय, गाढवांच्या विक्रीतून पाकिस्तान दरवर्षी कोट्यावधी रुपयांची कमाई करत आहे. पाकिस्तानात गेल्या तीन वर्षात गाढवांची संख्या तीन लाखांनी वाढली आहे. त्यामुळे आता देशात एकूण ५६ लाख गाढवे आहेत. या गाढवांना चीनला पाठवण्याची तयारी सरकारने सुरू केल्याची माहिती आहे.

Advertisement

देशात आर्थिक सर्वेक्षण केले होते. त्यात असे दिसून आले की, गाढवच हा असा एक प्राणी आहे, ज्याची संख्या २००१-२००२ पासून प्रत्येक वर्षात एक लाख या दराने वाढत आहे. या व्यतिरिक्त घोडे, खेचर, उंट या प्राण्यांची संख्या मात्र स्थिर आहे. याआधीच्या सरकारांच्या काळात देशात गाढवांची संख्या ४ लाखांनी वाढली होती. या गाढवांच्या माध्यमातून पाकिस्तान दरवर्षी कोट्यावधी रुपयांची कमाई करत आहे. याचे कारण म्हणजे, पाकिस्तानने चीन बरोबर एक करार केला आहे. त्यानुसार पाकिस्तान दरवर्षी ८० हजार गाढवे चीनला पाठवत आहे. चीनमध्ये या गाढवांचा उपयोग मांस आणि अन्य कामांसाठी केला जातो. गाढवांच्या कातड्यापासून मिळणाऱ्या जिलेटीनचा वापर विविध प्रकारची औषधे तयार करण्यासाठी केला जातो. या व्यापारासाठी अनेक चिनी कंपन्यांनी पाकिस्तानात कोट्यावधींची गुंतवणूक केली आहे. गाढवांच्या संख्येचा विचार केला तर पाकिस्तान जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Advertisement

एका अहवालानुसार पाकिस्तानात एका गाढवाच्या कातड्याची १५ ते २० हजार पाकिस्तानी रुपये किंमत आहे. त्यामुळे या गाढवांची विक्री करुन पाकिस्तान चांगलाच नफा कमावत आहे. आताही गाढव चीनला पाठवण्याचे नियोजन सरकारकडून केले जात आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटात पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. महागाई सुद्धा वाढली आहे. कर्जाचा डोंगर तर आहेच. कर्जाची परतफेड करण्यासाठी तसेच अर्थव्यवस्थेस आधार देण्यासाठी या देशाला पुन्हा कर्ज घ्यावे लागत आहे. दुसरा पर्यायही राहिलेला नाही. त्यामुळेच विरोधक आणि नागरिक सरकारवर जोरदार टीका करत आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास देणारे निर्णय सरकारकडून घेतले जात आहेत. तर स्वतःचेच नुकसान करणारे निर्णय सुद्धा येखील राज्यकर्ते घेत आहेत. त्यामुळे हा देश आर्थिक संकटात जास्तच अडकत चालला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply