Take a fresh look at your lifestyle.

भाजपची ‘ती’ मंडळी काँग्रेसमध्ये येण्याच्या तयारीत; पहा नेमके काय म्हटलेय पटोलेंनी

अमरावती : राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत असले तरी निवडणुकीबाबत या सत्ताधारी पक्षांची धोरणे वेगळी आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याआधी काँग्रेस पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे म्हंटले होते. आज पुन्हा एकदा त्यांनी पुन्हा एकदा असे सांगितले आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी आगामी निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावरच लढणार आहे, असे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. तसेच भाजपमधील अनेक जण काँग्रेस मध्ये येण्यास इच्छुक असून त्यांची यादी सुद्धा आपल्याकडे आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.

Advertisement

नाना पटोले सध्या विदर्भातील जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी आगामी निवडणुकांबाबत काँग्रेस पक्षाचे काय धोरण आहे, हे स्पष्ट केले. राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी आहे, तरी काँग्रेसने अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. काही मुद्द्यांवर मतभेद सुद्धा आहेत. राज्यात मध्यंतरी घडलेल्या काही घटनांवरून ते दिसून आले आहे. काँग्रेसचे नेते सुद्धा अस्तित्व दाखवण्यासाठी अधूनमधून अशी काही विधाने करत असतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे याआधी म्हटले होते, त्यावेळी सुद्धा राजकीय विश्वातून प्रतिक्रिया आल्या होत्या, आता त्यांनी पुन्हा एकदा असेच वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्वच काही आलबेल नसल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

Advertisement

इतकेच नाही तर भाजपमधील काही जण काँग्रेस मध्ये येणार असल्याचा दावा सुद्धा केला आहे. त्याची मोठी यादी  आपल्याकडे आहे, पण आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार केले जाईल, असे पटोले यांनी सांगितले. त्यामुळे राजकीय विश्वात जोरदार चर्चा होत आहेत. या मुद्द्यावर भाजपचे नेते प्रतिक्रिया देणार नाहीत असे होणार नाही. कारण, सरकार पडणार असल्याची वक्तव्ये भाजपचे नेते कायमच करत असतात. आणि आता तर भाजपमधीलच काही जण काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा दावा केला जात असल्याचे म्हटल्यावर भाजपकडून आता काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply