Take a fresh look at your lifestyle.

चीनने केला होता ‘तो’ही गोंधळ; पहा व्यापाराच्या नावाखाली करोनाच्या अगोदरच काय करून ठेवले होते ते

दिल्ली : चीन हा असा देश आहे जो कधी काय करील याचा काहीच अंदाज नाही. कोरोना विषाणूची माहिती वेळेवर दिली नाही, त्यामुळे हा विषाणू जगभरात पसरला. त्यानंतरही या विषाणूची खरी माहिती देण्यास चीन तयार नाही. चीन माहिती देण्यास तयार नसला तरी आता जगाने चीनची पोलखोल करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाबाबत असे काही अहवाल आणि दावे केले जात आहेत, की त्यामुळे चीन चांगलाच अस्वस्थ झाला आहे. आताही पुन्हा असाच एक धक्कादायक अहवाल आहे. त्यातूनही चीनने जगापासून न सांगितलेला असाच एक प्रकार उघड झाला आहे.

Advertisement

या अहवालात अनेक धक्कादायक प्रकारांचा खुलासा करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी जगभरात कोरोना फैलावण्या आधी चीनच्या वुहान प्रांतातील बाजारात हजारो जंगली जानवरांची विक्री करण्यात आली होती. ज्या जनावरांची विक्री करण्यात आली होती, त्यांच्यात असे रोगाणु होण्याची शक्यता असते की ज्यामुळे माणसांमध्ये सुद्धा संक्रमण होऊ शकते. चाइना वेस्ट नॉर्मल युनिवर्सिटीट, ऑक्सफोर्ड युनिवर्सिटी आणि कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया विश्वविद्यायाच्या अभ्यासकांच्या पथकाच्या अभ्यासाद्वारे हा दावा करण्यात आला आहे. अभ्यासकांनी जवळपास ३८ प्रजातींच्या ४७ हजार ३८१ प्राण्यांचा अभ्यास केला. यामध्ये ३१ प्राण्यांच्या प्रजातींचा समावेश होता ज्यांची वुहानच्या बाजारात मे २०१७ ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान विक्री केली होती.

Advertisement

मिंक, पाम सिवेट, रैकून कुत्रे यांसारख्या प्राण्यांची विक्री केल्याचे दिसून आले. मात्र, वटवाघूळ, पैंगोलिनची विक्री झाल्याचे पुरावे आढळले नाहीत. पाम सिवेट हा प्राणी २००३ मध्ये आलेल्या सार्स उद्रेकातही सहभागी होता. या अहवालात असेही म्हटले आहे, की ज्या प्रजातीच्या प्राण्यांची विक्री झाली त्यामध्ये कोविड १९ पेक्षा वेगळ्या संक्रामक रोग किंवा रोग-रोधी परजिवींना होस्ट करण्याची क्षमता होती. म्हणजेच, यामध्ये एखादा घातक विषाणू तयार होऊ शकत होता. ज्यामुळे माणसांना धोका निर्माण होऊ शकला असता.

Advertisement

दरम्यान, याआधी जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने चीनचा दौरा केला होता. कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबाबत तपासणी करण्यात आली होती. त्याच वेळी या पथकाने या काळात वुहानच्या बाजारात कोणत्या वन्यप्राण्यांची विक्री झाली, याचीही माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. कारण, कोरोना विषाणू प्राण्यांद्वारे माणसात फैलावल्याचा दावाही त्यावेळी केला जात होता. या अहवालातून मात्र याबाबतीत स्पष्ट माहिती दिलेली नाही.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.