Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारची कमाल; करोनाच्या भीषण संकटातही ‘त्यामध्ये’ चक्क ६.४८२ अब्ज डॉलरने वाढ..!

दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याने राज्यांनी निर्बंध कमी केले आहेत. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अर्थव्यवस्था वेग घेत आहे. या संकटात आता एक चांगली बातमी मिळाली आहे. जीएसटी संकलनातून केंद्र सरकारचे उत्पन्न वाढत आहे. तसेच परकीय चलन साठा सुद्धा वाढत चालला आहे. ४ जून रोजी संपलेल्या आठवड्यात देशाची परकीय चलन साठा ६०० अब्ज डॉलर्सच्याही पुढे गेला आहे.
याबाबत आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात चलन साठ्यात ६.४८२ अब्ज डॉलरने वाढ झाली. त्यामुळे आजमितीस एकूण परकीय चलन साठा ६०५.००८ अब्ज डॉलर इतका झाला आहे. विशेष म्हणजे, कोरोना विषाणूचे संकट असतानाही फक्त एकाच वर्षात या साठ्यात तब्बल १०० अब्ज डॉलर्सने वाढ झाली आहे.

Advertisement

मागील काही वर्षांचा विचार केला तर एप्रिल २००७ मध्ये २०० अब्ज डॉलर इतक चल साठा होता. त्यानंतर पुढील सात वर्षात यामध्ये १०० अब्ज वाढ होऊन ३०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला. पुढील तीन वर्षात यात आणखी १०० अब्ज डॉलर्सची भर पडली. २०१७ मध्ये भारताचा परकीय चलन साठा ४०० अब्ज डॉलर्स इतका होता. त्यानंतर पुढील अडीच वर्षात १०० अब्ज डॉलर्स आणखी वाढले. जून २०२० मध्ये हा चलन साठा ५०० अब्ज डॉलर्स इतका होता. कोरोना विषाणू आल्यानंतर मात्र याचा फटका चलन साठ्यास बसेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र असे काहीही घडले नाही. उलट याच काळात सर्वाधिक वेगाने चलन साठा वाढली. फक्त एकाच वर्षाच्या काळात यामध्ये १०० अब्ज डॉलर्सची वाढ होऊन सद्यस्थितीत चलन साठ्याने सहाशे अब्ज डॉलर्सचा टप्पा सुद्धा पार केला आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवला असताना परकीय चलन साठा इतक्या वेगाने कसा वाढला. असे काय घडले याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात होते. तज्ज्ञांनी मात्र या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्यांच्या मते, या मागचे महत्वाचे कारण म्हणजे देशात कोरोना विषाणू वेगाने फैलावत असतानाही विदेशी गुंतवणूकदारांनी भारतावरील विश्वास कायम ठेवला. तसेच अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी मागील वर्षभरात केंद्र सरकारने जे काही प्रयत्न केले आहेत, त्याबाबत बहुतांश विदेशी गुंतवणूकदार आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ सहमत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply