Take a fresh look at your lifestyle.

भारत बायोटेकला झटका; अमेरिकेने नाकारली कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता

मुंबई : भारतीय स्वदेशी लस असलेल्या कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यास अमेरिकेच्या अन्न व औषधी प्रशासनाने (एफडीए) तयारी दाखवलेली नाही. त्यामुळे ही लस निर्माण करणाऱ्या भारत बायोटेकला मोठा झटका बसला आहे. कारण, त्यांना आता अमेरिकेत ही लस पाठवणे शक्य होणार नाही.

Advertisement

एफडीएने भारत बायोटेकच्या अमेरिकन भागीदार कंपनी ऑक्युजेनला लसीच्या अतिरिक्त चाचण्या घेण्यास सांगितले असून कंपनी बायोलॉजिक्स परवाना यासाठी अर्ज करू शकणार आहे. यानंतरच कंपनीच्या लसीला तिथे पूर्णपणे मंजुरी मिळू शकणार आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिनचे अमेरिकेतील लाँचिंग थांबवण्यात आलेले आहे. अमेरिकेत ही लस अाणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ऑक्युजेनचे सहसंस्थापक शंकर मुसुनुरी यांनी म्हटले आहे.

Advertisement

प्री क्लिनिकल स्टडी, रसायन, उत्पादन आणि नियंत्रण तथा क्लिनिकल ट्रायलचे निकाल अमेरिकन एफडीएला मास्टर फाईल स्वरूपात पाठवले होते. भारतात निर्मित, विकसित कोणत्याही लशीला एफडीएकडून पूर्णपणे मंजुरी मिळालेली नाही. तसेच सहा महिन्यांनंतरही तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलचा डेटा भारत बायोटेक देऊ शकली नसल्याने ही मान्यता रोखण्यात आलेली आहे. र्ड इम्युनिटी आणि मोठ्या प्रमाणातील लसीकरणामुळे अमेरिकेत महामारी नियंत्रणात येत आहे. त्यामुळे एफडीएने यापूर्वीच लसीला आपत्कालीन मान्यता दिली जाणार नसल्याचे कळवल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply