Take a fresh look at your lifestyle.

अमेरिकेने घेतलाय ‘तो’ महत्वाचा निर्णय; पहा अवघ्या जगावर काय सकारात्मक परिणाम होणार

वॉशिंग्टन : कोरोनास रोखण्यासाठी लसीकरण प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे जगातील विकसित आणि श्रीमंत देशांनी आपल्या नागरिकांचे पटापट लसीकरण केले, त्यामुळे या देशात आज कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. काही देशात लसीकरण वेगाने सुरू असून या देशांनीही कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. पण, गरीब देशांचे काय, येथील लोकांना लस मिळणार का, असे प्रश्न कायम आहेत. काही देश तर असे आहेत, की त्यांनी अद्याप लस देखील प्रत्यक्ष पाहिलेली नाही. ते काहीही असले तरी या देशातील कोरोनाचा नायनाट केल्याशिवाय कोरोना विरुद्धची लढाई जिंकता येणार नाही, हे सुद्धा खरे आहे.

Advertisement

जागतिक आरोग्य संघटना आणि अन्य जागतिक संस्थांनी सुद्धा गरीब देशांना श्रीमंत देशांनी लसी देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाचे सकारात्मक परिणाम होत असल्याचे आता दिसत आहे. कारण, अमेरिकेने ९२ देश आणि आफ्रिकी संघ यांना ५० कोटी कोरोना प्रतिबंधक लसी देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन सध्या ब्रिटेनच्या दौऱ्यावर आहेत. येथे आयोजित जी ७ शिखर संमेलनात बायडेन याबाबत घोषणा करण्याची शक्यता  आहे.

Advertisement

साधारण ऑगस्ट महिन्यापासून लसींच्या पुरवठ्यास सुरुवात होणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत २० कोटी लस पुरवठा करण्याचे उद्दीष्ट आहे. त्यानंतर उर्वरीत ३० कोटी लसी २०२२ या वर्षातील पहिल्या सहा महिन्यात देशांना पोहोच केल्या जाती. कोवैक्स अभियानांतर्गतही अमेरिका मध्यम व कमी उत्पन्न असणाऱ्या देशांना कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध करुन देणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे गरीब देशांना फायदा होणार आहे. या देशातही कोरोना प्रतिबंधक लसीकरण लवकरच सुरू होणार आहे.

Advertisement

दरम्यान, याआधी भारताने सुद्धा अशाच पद्धतीने अनेक देशांना लसी दिल्या होत्या. नंतर मात्र भारतात दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढला, देशांतर्गत लसींची मागणी वाढली. त्यामुळे दुसऱ्या देशांना लस निर्यात बंद करण्यात आली. आताच्या परिस्थितीत अन्य देशांना लस पुरवठा करणे भारतास शक्य नाही. त्यामुळे अनेक देशांच्या अडचणी वाढल्या. त्यानंतर चीनने जवळपास ४० देशांना लस देण्याची घोषणा केली होती. चीनने या देशांना लसी दिल्या किंवा नाही याबाबत मात्र माहिती नाही.  त्यानंतर आता अमेरिकेने पुन्हा गरीब देशांना लसी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply